Ahmednagar Politics : ‘खटका जुळवला, अदृश्य राजकीय शक्तींनी मदत केली, लवकरच अनुभूती’..निलेश लंके यांना मदत करणारी अहमदनगरमधील अदृश्य शक्ती कोण?

Ahmednagarlive24 office
Published:
lanke

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्याची लोकसभा निवडणूक निलेश लंके व खा. सुजय विखे अशी झाल्याने प्रचंड गाजली. दोघांनीही एकमेकांस तोडीसतोड टक्कर दिली असल्याचे बोलले जाते. आता येत्या चार तारखेला या सामन्याचा रिझल्ट येईल. दरम्यान त्याआधीच माजी आ. निलेश लंके यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

शेवगावमध्ये एका कार्यक्रमात बोलता ते म्हणाले, ‘मी कमी शिकलो आहे, इंग्रजी येत नाही, असा आरोप झाला; पण मी ‘आयटीआय’चा फिटर आहे, कोणता पान्हा कसा लावायचा याचा खटका मला चांगलाच माहीत आहे. तो जुळवला असून, याची अनुभूती लवकरच येईल.संख्य अदृश्य राजकीय शक्तींनी मदत केली.

कोणी कोणी मदत केली आज जाहीर करणार नाही असेही ते म्हणाले. त्यामुळे आता या अदृश्य शक्ती कोण याची चर्चा सध्या सुरु आहे. कोनोशी (ता. शेवगाव) येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते अॅड. प्रताप ढाकणे, शिवशंकर राजळे, दिनकर पालवे, रामदास गोल्हार, वंचितचे उमेदवार दिलीप खेडकर आदी उपस्थित होते.

छळणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्नशील
लोकसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांची मदत मिळाली. सर्वपक्षीय कार्यकर्ता सोबत असून, सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीनंतर आकसबुद्धीचे राजकारण करून कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू केले.

त्यांनी ते करू नये अन्यथा ४ जूननंतर सर्व हिशेब चुकता केला जाणार आहे. आमच्यावर सातत्याने गुंडगिरीचा आरोप केला जातो पण आम्ही गुंड नसून गरिबाला छळणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्नशील असतो.

अदृश्य शक्तींची मदत
पैसे कमविण्यापेक्षा जिवाभावाची माणसं सोबत असली, तर जीवनात काही कमी पडत नाही. माझी प्रस्थापितांच्या विरोधात लढाई आहे. लोकसभेत चार पिढ्या राजकारण करणाऱ्यांच्या विरोधात लढणे हे सोपे काम नव्हते पण असंख्य अदृश्य राजकीय शक्तींनी मदत केली. कोणी कोणी मदत केली आज जाहीर करणार नाही; पण निकालानंतर सर्व कळणार आहे असे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe