हॉटेलमध्ये राहण्यासाठी रूम बुक केला का? रूममध्ये स्पाय कॅमेरा तर नाही ना? ‘ही’ ट्रिक्स वापरा आणि कॅमेरा आहे की नाही लगेच माहिती करा

Hotel Room Booking

आपल्याला कामानिमित्त किंवा काही कारणांनी एखाद्या शहरामध्ये जावे लागते व त्या ठिकाणी आपल्याला काही दिवस थांबावे लागते. अशा अनोळखी ठिकाणी आपले नातेवाईक किंवा मित्रपरिवार नसल्यामुळे राहण्यासाठी आपल्याला हॉटेलच्या रूम शिवाय पर्याय नसतो किंवा बऱ्याचदा आपण कुटुंबासमवेत बाहेर कुठे फिरायला जातो तेव्हा देखील आपण हॉटेल बुक करून त्या ठिकाणी आपल्याला जितके दिवस राहायचे आहे तितके दिवस राहतो.

परंतु यामुळे आपली राहण्याची समस्या मिटते परंतु बऱ्याचदा अशा हॉटेलच्या रूममध्ये किंवा चेंजिंग रूममध्ये स्पाय कॅमेरे म्हणजेच छुपे कॅमेरे लावण्यात आलेले असतात व या पद्धतीचे कॅमेरे आपल्या खाजगी गोष्टींसाठी धोक्याचे ठरू शकतात.

तसेच अशा पद्धतीने कॅमेरे शोधणे देखील जीकीरीचे असते. त्यामुळे या लेखामध्ये आपण अशावेळी हॉटेलच्या रूम मध्ये असणारा स्पाय अर्थात छुपा कॅमेरा कसा शोधावा? याविषयीच्या काही ट्रिक्स जाणून घेऊ.

 हॉटेलच्या रूममधील स्पाय कॅमेरा अशा पद्धतीने शोधा

हॉटेलच्या रूममध्ये तुम्ही जेव्हा हिडन कॅमेरा डिटेक्टरचा वापर कराल त्याअगोदर अशा हॉटेलच्या रूममध्ये अशा पद्धतीचे कॅमेरे कुठे कुठे लावले जाऊ शकतात हे पाहणे गरजेचे आहे. त्यानंतर रूम मध्ये तुम्ही जेव्हा चेक इन केल्यावर जाल तेव्हा हिडन कॅमेरा डिटेक्टरचा वापर करून अशा पद्धतीने तुम्ही छुपा कॅमेराचा शोध घेऊ शकता.

जर आपण हॉटेल रूममधील काही जागा पाहिल्या तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने स्पाय कॅमेरे लावलेले असू शकतात व यामध्ये खास करून स्विच बोर्ड, फॅन तसेच एअर कंडिशनर,बेड, टीव्हीच्या खाली, रूम मध्ये फ्लॉवर पॉट असेल तर त्या जवळ किंवा त्यामध्ये, फायर अलार्म इत्यादी जागांवर अशा पद्धतीने कॅमेरे लावलेले असू शकतात.

रूममधील या जागांशिवाय तुम्ही बाथरूम आणि वाशरूम देखील व्यवस्थितपणे तपासणी गरजेचे आहे. खास करून या जागांवर हिडन कॅमेरा डिटेक्टरचा वापर करून तुम्ही स्पाय कॅमेऱ्याचा शोध घेऊ शकतात.

 हिडन कॅमेरा डिटेक्टरची किंमत किती असते?

हॉटेलच्या रूममधील स्पाय अर्थात छुपे कॅमेरे शोधण्यासाठी हिडन कॅमेरा डिटेक्टर खूप महत्त्वाचा असतो. जर आपण हिडन कॅमेरा डिटेक्टरची किंमत पाहिली तर ॲमेझॉन वरती 499 रुपयापासून सुरू होते तर 999 पर्यंत असू शकते.

यामध्ये जर तुम्ही डेव्हिल विल क्राय हा डिटेक्टर कॅमेरा विकत घेतला तर हा एक अत्याधुनिक अशा टेक्नॉलॉजी वापरून तयार करण्यात आलेला आहे. या कॅमेऱ्याची ॲमेझॉन वरची किंमत ही 5999 रुपये इतकी आहे. तो तुम्हाला जर सेलमध्ये घ्यायचा असेल तर तुम्हाला हा डिटेक्टर कॅमेरा अवघ्या 3499 रुपयांना मिळू शकतो.

अशा पद्धतीने जर तुम्ही हॉटेलमध्ये रूम बुक केला तर हिडन डिटेक्टर कॅमेरा चा वापर करून स्पाय कॅमेराचा शोध घेऊ शकतात व होणाऱ्या पुढील समस्या पासून वाचू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe