Fertilizer Management: एका एकर सोयाबीनसाठी ‘ही’ खते वापरा आणि भरघोस उत्पादन मिळवा! वाचा सोयाबीनचे खत व्यवस्थापन

Ajay Patil
Published:
Fertilizer Management

Fertilizer Management :- खरीप हंगामात तोंडावर आला असून बहुतांश शेतकऱ्यांनी आता खरीप हंगामाची तयारी देखील सुरू केलेली आहे व या खरीप हंगामामध्ये महाराष्ट्रात प्रामुख्याने सोयाबीन आणि कापूस या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. खरीप हंगामातील आर्थिक गणित प्रामुख्याने या दोन्ही पिकांवर अवलंबून असते व त्यातल्या त्यात सोयाबीन या पिकाची लागवड महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये केली जाते.

साहजिकच आर्थिक दृष्टिकोनातून सोयाबीन हे पीक महत्त्वाचे असल्यामुळे त्याकरिता त्याची व्यवस्थापन देखील तितकेच काळजीपूर्वक करणे गरजेचे असते व यामध्ये प्रामुख्याने खत व्यवस्थापनाला अनन्यसाधारण असे महत्त्व असते.

भरघोस उत्पादनासाठी सोयाबीन पिकाला ज्या काही पोषक घटकांची आवश्यकता असते ते पोषक घटक त्यांच्या माध्यमातून पिकाला मिळत असल्याने आवश्यक ते खत व्यवस्थापन करून बेसुमार रासायनिक खतांच्या वापरापासून आपल्याला वाचता येते व खर्चात देखील बचत होते.

तर योग्य पद्धतीने खत व्यवस्थापन केले तर पिकाची वाढ चांगली होते व दाणे देखील टपोरे येतात व सोयाबीनचे उत्पादन वाढते. याकरिता या लेखामध्ये आपण एका एकर सोयाबीन करिता खत व्यवस्थापन कसे करावे व कोणते खतांच्या मात्रा किती द्याव्यात? याबद्दलची माहिती घेऊ.

 सोयाबीन पिकासाठी महत्त्वाचे खत व्यवस्थापन

ज्याप्रमाणे कोणत्याही पिकाला मुख्य अन्नद्रव्यांची गरज असते व त्यासोबत झिंक, मॅगनीज सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील गरज असते अगदी त्याच पद्धतीने सोयाबीनला देखील अन्नद्रव्यांची गरज असते व त्यामुळे सोयाबीनला खतांच्या योग्य मात्रा देणे आवश्यक असते. सोयाबीनचे जास्त उत्पादनासाठी सल्फर चे महत्व अनन्यसाधारण असते व प्रती एकर दहा किलो सल्फर दिले तर उत्पादनात वाढ होऊ शकते. सोयाबीनसाठी खत व्यवस्थापन करताना प्रति एकर करिता…

1- युरिया 26 किलो+ सिंगल सुपर फॉस्फेट दीडशे किलो+ पोटॅश 20 किलो आणि सल्फर 10 किलो प्रति एकर द्यावे.

2-20:20:20 60 किलो+ सिंगल सुपर फॉस्फेट 75 किलो+ सल्फर दहा किलो( प्रति एकर)

3-19:19:19 63 किलोग्रॅम+ सिंगल सुपर फॉस्फेट 75 किलोग्रॅम+ सल्फर दहा किलो प्रति एकर द्यावे.

4-18:46:00 म्हणजेच डीएपी 52 किलो+ पोटॅश 20 किलो+ सल्फर आठ किलो प्रती एकर द्यावे.

5-10:26:26 46 किलो+ युरिया 16 किलो+ सिंगल सुपर फॉस्फोट 75 किलो व सल्फर 10 किलो प्रती एकर द्यावे.

6-12:32:16 75 किलो+ सिंगल सुपर फॉस्फेट 75 किलो आणि सल्फर 10 किलो प्रती एकर द्यावे.

अशा पद्धतीने जर सोयाबीनचे खत व्यवस्थापन केले तर नक्की सोयाबीन पासून भरघोस उत्पादन मिळू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe