7th Pay Commission:- नुकत्याच लोकसभा निवडणुका 2024 चा निकाल जाहीर झाला व आता नवीन सरकारचा शपथविधी होईल व या पार्श्वभूमीवर आता काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या जातील अशी एक शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.जर आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कर्मचाऱ्यांसाठी काही आनंदाची बातमी समोर येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच महागाई भत्ता वाढवला जाईल अशी शक्यता असून जर सरकारच्या माध्यमातून महागाई भत्ता वाढवण्यात आला तर कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये देखील चांगली वाढ होईल. कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कित्येक दिवसापासूनची मागणी असलेला आठवा वेतन आयोगाचा प्रश्न देखील मार्गी लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महागाई भत्त्यात होऊ शकते चार टक्क्यांनी वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या महागाई भत्ता अर्थात डीए मध्ये परत एकदा चार टक्क्यांची वाढ केली जाईल असे मानले जात आहे. अर्थात केंद्र सरकारच्या माध्यमातून अजून पर्यंत अधिकृतपणे याबाबतीत कुठल्याही पद्धतीने स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. परंतु असे असले तरी जूनच्या शेवटच्या आठवड्यात याबाबत काही घोषणा होऊ शकते असा दावा अनेक मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात येत आहे.
महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढला तर पगारात किती होईल वाढ?
केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला गेला तर तो 54 टक्के होईल. कारण सध्या कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्त्याचा लाभ मिळत आहे. जर चार टक्क्यांची परत वाढ झाली तर कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये चांगली वाढ होईल असे मानले जात आहे.
समजा कर्मचाऱ्यांचा पगार जर 40 हजार रुपये असेल तर चार टक्के महागाई भत्ता वाढीसह पगारात 16000 रुपयांनी वाढ होईल. वार्षिक पगार हा 19 हजार दोनशे रुपयांनी वाढेल व हि वाढ कर्मचाऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरणार आहे.
केंद्र सरकारच्या माध्यमातून दरवर्षी महागाई भत्त्यामध्ये दोनदा वाढ केली जाते व हे वाढलेले दर एक जानेवारी आणि एक जुलैपासून लागू केले जातात. समजा आता जर महागाई भत्त्यात वाढ केली गेली तर त्याचे दर एक जुलैपासून लागू होतील.
आठव्या वेतन आयोगाबाबत होऊ शकतो निर्णय?
सरकारच्या माध्यमातून आठव्या वेतन आयोगाबाबत देखील काही आश्चर्यकारक निर्णय घेतले जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे मानले जात आहे की यावर्षी आठवा वेतन आयोग तयार केला जाऊ शकतो व तो 2026 मध्ये लागू केला जाईल. परंतु या सर्व शक्यता आहेत व सरकारने अजून पर्यंत तरी आठव्या वेतन आयोगावर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. परंतु काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये दावा केला जात आहे की तो लवकरच आणला जाईल.