बरेच जणांना बाईक खरेदी करायची असते व चांगली बाईक मिळवण्यासाठी प्रत्येक जण आपल्याला प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. त्यातल्या त्यात कमीत कमी किमतीत चांगले वैशिष्ट्ये आणि मायलेज असलेली बाईकच्या शोधात असल्याचे आपल्याला बरेच जण दिसून येतात.
यामध्ये काही व्यक्ती असे असतात की त्यांना नवीन बाईक ऐवजी सेकंड हॅन्ड बाईक खरेदी करायची असते व सेकंड हॅन्ड मध्ये देखील खूप कमीत कमी किमतीत चांगल्या कंडिशन आणि वैशिष्ट्य असलेल्या बाईक आपल्याला मिळतात. आता त्याकरिता आपल्याला थोडेसे मार्केट रिसर्च करणे गरजेचे असते व सेकंड हॅन्ड बाईक विक्री होणाऱ्या ठिकाणांवरून व्यवस्थित माहिती घेऊन बाईक खरेदी केली तर फायदा होतो.
तुम्हाला देखील चांगल्या कंडिशनमध्ये असलेली सेकंड हॅन्ड बाईक विकत घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही हिरोची हिरो सीबीझेड एक्स्ट्रीम ही बाईक खरेदी करू शकतात. ही बाईक तुम्हाला अगदी कमीत कमी किमतीमध्ये आणि चांगल्या कंडिशनमध्ये मिळेल.
कमीत कमी किमतीत घ्या हिरोची ही बाईक
तुम्हाला जर हिरो कंपनीची पावरफुल बाईक घ्यायची असेल व तुमच्याकडे पैसा कमी असल्यामुळे जर तुम्हाला नवीन बाईक खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही हिरो कंपनीची हिरो सीबीझेड एक्स्ट्रीम ही सेकंड हॅन्ड बाईक खरेदी करू शकतात. हिरोची एक्स्ट्रीम 160R चा स्पोर्टी लुक व्यक्तीला अक्षरशः वेड लावते इतकी ही बाईक आकर्षक आहे.
या बाईकच्या आकर्षक हेडलाईस तसेच मस्क्युलर फ्युएल टॅंक आणि शार्प टेल सेक्शन या एकत्रित वैशिष्ट्यांमुळे ही बाईक अतिशय शक्तिशाली आणि आकर्षक दिसते. या बाईक मध्ये कंपनीने 163 सीसी एअर कुल्ड इंजिन दिले असून हे इंजिन 14.7 बीएचपी पावर आणि 14.1 Nm टॉर्क जनरेट करते. पिकप च्या बाबतीत देखील ही बाईक उत्तम असून हायवेवर जेव्हा तुम्ही राईड कराल तेव्हा तुम्हाला अत्युच्च वेगाचा आनंद या बाईक रायडिंगतून मिळतो.
किती देते मायलेज?
हिरो एक्स्ट्रीम 160R ही बाईक केवळ रायडिंग ची मजा दुप्पट करत नाही तर उत्कृष्ट मायलेज देखील देते. या बाईकच्या मायलेज बद्दल कंपनीचा दावा आहे की ही बाईक 50 kmpl पेक्षा जास्त मायलेज देऊ शकते. असेच तुमची चालवण्याची पद्धत आणि ट्रॅफिक या परिस्थितीवर देखील मायलेज अवलंबून असते. परंतु साधारणपणे जर सरासरी पकडले तर 40 ते 45 Kmpl चे मायलेज या बाईकच्या माध्यमातून मिळते.
ही बाईक डिझाईन करताना रायडरला आरामदायी रायडिंगचा अनुभव मिळेल याची पुरेपूर काळजी घेऊन तयार करण्यात आलेली आहे. सीट रुंद आणि आरामदायी असून हँडल बारची स्थिती वैशिष्ट्यपूर्ण असून तुम्ही लांब प्रवास केला तरी देखील पाठदुखीचा त्रास जाणवत नाही.
कारण यामध्ये टेलिस्कोपिक सस्पेन्शन फ्रंट आणि मोनो शॉक सस्पेन्शन रियर देण्यात आले आहे. या वैशिष्ट्यांमुळे तुम्ही खराब रस्त्यांवर देखील प्रवास केला तरी तुम्हाला धक्के जाणवत नाहीत. यासोबतच या बाईक मध्ये फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी हेडलाईट तसेच डिजिटल फ्युअल गेज आणि सर्विस रिमाइंडर सारखी वैशिष्ट्ये देखील देण्यात आलेले आहेत.
32500 मध्ये कुठे मिळेल ही बाईक?
जर आपण या बाईकची किंमत पाहिली तर याची किंमत खूप कमी असून सेकंड हॅन्ड मध्ये विक्रीसाठी असलेले हे मॉडेल 2011 चे असून याची किंमत बत्तीस हजार पाचशे रुपये आहे. विशेष म्हणजे या बाईकची कंडिशन खूप चांगली असून आतापर्यंत 78 हजार किलोमीटर चालली आहे. तुम्हाला जर ही बाईक खरेदी करायची असेल तर तुम्ही ऑनलाईन सेकंड हॅन्ड मार्केट क्विकर या वेबसाईटवर जाऊन खरेदी करू शकतात.