8th Pay Commission:- सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई तसेच घरभाडे भत्ता, मिळणारे इतर भत्ते व वेतन आयोग यांना खूप महत्त्व असते. कारण या सगळ्या गोष्टींचा संबंध कर्मचाऱ्यांच्या थेट पगाराशी येतो.त्यामुळे महागाई भत्त्यातील वाढ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची असते. सध्या कर्मचाऱ्यांना जे काही महागाई भत्ता किंवा इतर भत्तांचा लाभ दिला जात आहे तो सातव्या वेतन आयोगानुसार दिला जात आहे.
परंतु आता कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा असून लोकसभा निवडणुका 2024 चा निकाल लागल्यानंतर आता स्थापन करण्यात येणाऱ्या नवीन सरकारकडून कर्मचाऱ्यांना व नागरिकांना देखील अनेक अपेक्षा आहेत.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाहिले तर नवीन सरकार आल्यावर आता आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु आतापर्यंत मात्र याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. साधारणपणे पुढच्या वर्षापर्यंत नवे सरकार याबाबत काही घोषणा करू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पावसाळी सेशनमध्ये सरकार करू शकते यावर चर्चा
केंद्र सरकारच्या माध्यमातून पुढच्या वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली जाईल अशी शक्यता असून तशी माहिती देखील समोर आली आहे. गेल्या कित्येक दिवसापासून चर्चा होते की आठवा वेतन आयोग येणार नाही. परंतु पुढील वेतन आयोगाची म्हणजेच आठव्या वेतन आयोगाची तयारी सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून यावर अजून पर्यंत तरी कुठलीही स्पष्टता आलेली नाही. परंतु आगामी येऊ घातलेल्या पावसाळी अधिवेशनात यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आठवा वेतन आयोग लागू केला तर किती वाढेल पगार?
केंद्र सरकारच्या माध्यमातून जर आठवा वेतन लागू केला गेला तर कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये मोठी वाढ होऊ शकते. याबाबत नियोजन आयोगाची स्थापना करण्यात येणार असं केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे याची जबाबदारी असणार असल्याची चर्चा देखील सध्या सुरू आहे. त्यानंतरच कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
जर केंद्र सरकारच्या माध्यमातून आठवा वेतन आयोग स्थापन करण्यात आला तर कर्मचाऱ्यांच्या वेतनात खूप मोठी वाढ होणार आहे. आठवा वेतन आयोग स्थापन झाला तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वाच्या असलेल्या फिटमेंट फॅक्टर 3.68 पटीने वाढेल व त्यामुळे केंद्र कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात तब्बल 44.44 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.