Budhaditya Rajyog : ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह एका विशिष्ट कालावधीत राशी बदलतात, या काळात, जेव्हा 2 ग्रह एका राशीमध्ये येतात तेव्हा एक संयोग तयार होतो आणि एक दुर्मिळ संयोग आणि राजयोग तयार होतो, ज्याचा प्रभाव सर्व राशींवर पडतो.
अशातच जून महिन्यात देखील बरेच ग्रह आपली राशी बदलणार आहेत. सूर्य, बुध, मंगळ, चंद्र आणि शुक्र यांचे संक्रमण होणार आहे, परंतु सूर्य आणि बुधाच्या हालचालीतील बदल खूप खास असणार आहे, कारण 14 जूनला बुध आणि 15 जूनला, सूर्य मिथुन राशीत प्रवेश करतील, ज्यामुळे बुद्धादित्य राजयोग तयार होईल. या राजयोगाचा फायदा काही मोजक्याच राशींना होईल, कोणत्या आहेत त्या राशी पाहूया…
मिथुन
जून महिन्यात तयार झालेला बुधादित्य राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी मानला जात आहे. या काळात नशीब पूर्ण साथ देईल. समाजात मान-सन्मान वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. जुन्या आजारापासून मुक्ती मिळेल. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळतील, वाहने आणि मालमत्ता खरेदीची योजना पूर्ण होऊ शकेल.
परदेशात नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल, अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन प्रकरणातील निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतात. या काळात अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात त्यामुळे व्यवसायात प्रगती होईल.
कन्या
बुध आणि सूर्य यांच्या संयोगामुळे आणि बुधादित्य राजयोग तयार झाल्यामुळे कन्या राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. नशीब तुमच्या बाजूने असेल. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात तुम्ही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. कर्मचाऱ्यांना पगारवाढ आणि इच्छित बदली-पोस्टिंगचा लाभ मिळू शकतो.
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे. प्रसारमाध्यम, राजकारण, बँकिंग आणि गणित या क्षेत्रांशी संबंधित लोकांना या काळात चांगले लाभ मिळू शकतात.
कुंभ
सूर्य-बुध युती आणि राजयोग तयार होणे राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. उत्पन्न वाढेल, अनेक नवीन स्रोत उघडतील. बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. करिअरमध्ये प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळतील. नोकरदारांना बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो.
व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळेल, त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल. वैवाहिक जीवन चांगले राहील.
सिंह
बुधादित्य राजयोग लोकांसाठी वरदानापेक्षा कमी सिद्ध होऊ शकत नाही. उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. गुंतवणुकीचा फायदा होईल. शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी वेळ उत्तम आहे, सट्टा आणि लॉटरी तुमच्या बाजूने असेल. नोकरीत प्रगती आणि व्यवसायात फायदा होण्याची दाट शक्यता आहे. बुध तुमची प्रतिष्ठा वाढवेल आणि रखडलेल्या कामांना गती मिळेल.