Ahmednagar news : मागील दोन तीन दिवसांपासून श्रीगोंदा तालुक्यातील बहुतांश भागात मान्सून पूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली असून, जोरदार पावसाने ओढे-नाल्यांना पाणी आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आतापर्यंत झालेल्या पावसात तालुक्यातील आठ महसूल मंडळांपैकी श्रीगोंदा मंडळात सर्वाधिक असा ६४.८ मिमी. पाऊस झाला तर सर्वात कमी देवदैठण १२.३ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
यंदा तापमानाने उचांक गाठला होता. तापमान ४०-४२ अंशापर्यंत जाऊन पोहोचले होते. उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे काही प्रमाणात उकाडा कमी झाला असतानाच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला आहे.

तालुक्यातील बहतांश भागात मागील तीन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन दिवसभर कडाक्याचे ऊन तर सायंकाळी वादळी वारे आणि आभाळ येत काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली असताना गुरुवारी रात्री तसेच शुक्रवारी पहाटे पावसाने विजांच्या कडकडाटासह श्रीगोंदा शहरासह काष्टी, कोळगाव, वादळी पावसामुळे काही प्रमाणात उकाडा कमी झाला असतानाच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनपूर्व पावसाने कोरेगाव, ढोकराई, मढेवडगाव, लोणी व्यंकनाथ, वडळी, घुगलवडगावात जोरदार हजेरी लावली. मान्सूनपूर्व पावसाने उकाड्यान हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला आहे. मान्सूनपूर्व सुरू झालेल्या पावसामुळे यंदा वेळेवर खरिपाच्या पेरणीला सुरुवात होईल, असा अंदाज बांधला जात आहे.