अन्यथा वाल्मिकी मेहतर समाज पिडीत कुटुंबीयांना संरक्षण देण्यासाठी उत्तरप्रदेशला जाणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- भिंगार येथील वाल्मिक नगरला उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदवून कँडल मार्च काढण्यात आला.

पिडीत तरुणीला श्रध्दांजली वाहून, सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. तर सदर प्रकरण दडपण्यासाठी योगी सरकार व पोलीस प्रशासन दबाव टाकत असल्याचा आरोप करुन, कुटुंबीयांना योग्य संरक्षण व न्याय न मिळाल्यास शहरातील वाल्मिकी मेहतर समाज पिडीत कुटुंबीयांना संरक्षण देण्यासाठी उत्तरप्रदेशला जाणार असल्याचे जाहिर करण्यात आले.

वाल्मिक नगरला काढण्यात आलेल्या कँडल मार्चमध्ये जगदीश कुडिया, कमल बागडी, मोहन बिल्लरबान, रमेश कुडिया, अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे, जिल्हा उपाध्यक्ष तालेवार गोहेरे, सचिव राहुल लखन, नरेंद्र तांबोली, सुशिल लोट, संदिप लखन, मनोज बिडलान, अमर उज्जेनवाला, अमित कुडिया, संतोष सारसर, विशाल बेलपवार, मंगेश मोकळ, सोनू गोहेर, धिरज बैद, रंजित चव्हाण, नरेश चव्हाण, आकाश कुडिया, अक्षय कुडिया, अतिश गोहेर, सुमित गोहेर, रवि गोहेर, रोहित चव्हाण, अभिजीत बसोड आदि परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.

महर्षी वाल्मिक ध्यान मंदिर येथे कँडल मार्चचा समारोप करुन पिडीत तरुणीच्या प्रतिमेसमोर पेटवलेल्या मेणबत्त्या ठेऊन, श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी योगी हटाव, बेटी बचावच्या घोषणा देण्यात आल्या. कमल बागडी यांनी जातीयवादी सरकारमुळे दलितांवर अन्याय होत असून, हे प्रकरण दडपण्यासाठी योगी सरकारने शक्ती पणाला लावली. या घटनेचा सर्वच समाजबांधव निषेध करीत असून, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आरोपींना फाशीची शिक्षा लवकरात लवकर मिळण्याची गरज असल्याचे सांगितले.

जगदिश कुडिया म्हणाले की, भारत हा लोकशाही व धर्मनिरपेक्ष देश असून, सध्या जातीयवाद फोफावला आहे. दलित युवतीवर अत्याचार होऊन देखील त्याची दखल घेतली जात नाही. उलट उत्तर प्रदेश पोलीस मुलीचा मृतदेह रात्रीतून जाळून टाकतात. तर मुलीवर बलात्कार झाला नसल्याचे उत्तर प्रदेश पोलीस सांगत आहे. पिडीत मुलीच्या कुटुंबीयांवर योगी सरकार दडपण आनत आहे. या प्रकरणात मुलीच्या कुटुंबीयांना न्याय न मिळाल्यास नगरहून वाल्मिकी मेहतर समाज पिडीत मुलीच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यास जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सनी खरारे म्हणाले की, हा एका समाजापुरता मर्यादीत प्रश्‍न राहिला नसून, आज प्रत्येक घरातील स्त्री असुरक्षित आहे. उत्तरप्रदेशात हुकुमशाही माजली असून, एक प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालू आहे. मुलीवर अत्याचार झाल्याची पोलीसांनी दखल घेऊन तीचा मेडिकल अहवाल घेण्याची गरज होती. मात्र पोलीसांनी हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकारींना निलंबीत करुन मुलीला न्याय मिळणार नसून, या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तर हे प्रकरण दाबणार्‍या योगी सरकार बडतर्फ करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment