Ahmednagar News : शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनीस धमकावून घेऊन जायचे, दोघे अनेकदा अत्याचार करायचे, अहमदनगरमधील खळबळजनक घटनेस वाचा…

Published on -

Ahmednagar News : शाळा सुटल्यानंतर रस्त्यावर अडवून ‘तु माझ्या घरी चल नाहीतर तुला जिवे मारून टाकेल’ आशी धमकी देत दोन तरुणांनी एका अल्पवयीन मुलीवर वेगवेगळ्या वेळी व ठिकाणी बळजबरीने अत्याचार केला. यात पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने या प्रकाराला वाचा फुटली आहे.

याप्रकरणी आरोपी राजेश बबन उगले व बाळासाहेब काशिनाथ लेंडे (दोघे रा. नायगाव, ता. जामखेड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी एका शाळेत शिकत आहे.

आरोपी राजेश बबन उगले याने जून २०२३ मध्ये शाळा सुरू झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी पीडित मुलीची शाळा सुटल्यानंतर तिला रस्त्यावर अडवून तु माझ्या सोबत आमच्या घरी चल नाहीतर जीवेच मारून टाकेल, अशी धमकी देऊन अत्याचार केला. तसेच ही घटना कोणाला सांगितली तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर वेळोवेळी पीडित मुलीवर अत्याचार केला.

तसेच २८ मार्च २०२४ रोजी वार्षिक परीक्षा दरम्यान देखील पीडित मुलीस धमकावून घरी बोलावून अत्याचार केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडित मुलीने तिच्या जबाबात सांगितले की, तिच्या राहत्या घरामध्ये एकटी असताना दुसरा आरोपी

बाळासाहेब काशिनाथ लेंडे हा घरी पाणी पिण्याच्या बहाण्याने गेला व अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. तसेच २६ जानेवारी २०२४ रोजी आरोपी बाळासाहेब लेंडे त्याच्या शेतामध्ये ज्वारीची कणसे टाकत असताना पीडित मुलीवर तेथेही अत्याचार केला असे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News