Mhada News: म्हाडाकडून मुंबईत गाळे विकत घेण्याची संधी! 173 गाळ्यांच्या विक्रीसाठी 27 जूनला होणार ई -लिलाव, वाचा कुठे आहेत किती गाळे?

mhada news

Mhada News:- ज्याप्रमाणे मुंबईत किंवा पुणे व इतर मोठे शहरांमध्ये घर घेण्याचे स्वप्न हे म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून पूर्ण करता येते. अगदी त्याचप्रमाणे व्यावसायिक गाळे विकत घेण्याची संधी देखील म्हाडाच्या माध्यमातून बऱ्याचदा उपलब्ध करून देण्यात येते.

कारण बऱ्याच व्यक्तींना व्यवसायासाठी किंवा इतर गोष्टींसाठी गाळ्यांची आवश्यकता असते. परंतु मुंबईसारख्या शहरांमध्ये गाळ्याच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून गाळ्याच्या विक्रीला प्रतिसाद देखील दिला जातो व या माध्यमातून जर गाळे घेतले तर काही प्रमाणात पैशांची बचत देखील होऊ शकते.

अगदी याचप्रमाणे तुमचा देखील मुंबईमध्ये गाळा विकत घेण्याचा प्लॅनिंग असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण अनिवासी गाळ्यांच्या विक्रीकरिता म्हाडाच्या माध्यमातून ई लिलाव होणार आहे. यासंबंधीचेच माहिती आपण या लेखात घेऊ.

 म्हाडाच्या 173 गाळ्याची होणार 27 जूनला लिलावाद्वारे विक्री

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गाळ्याच्या लिलावाच्या माध्यमातून विक्री करिता 27 फेब्रुवारीला म्हाडाच्या माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली व आता या ई लिलाव प्रक्रियेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला असून

या बदललेल्या वेळापत्रकानुसार या लिलावाची तारीख निश्चित करण्यात आलेली नव्हती. परंतु आता लोकसभा आचारसंहिता नसल्यामुळे ई लिलावाची तारीख व वेळ हाता निश्चित करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने..

म्हाडाच्या 173 गाळ्यांच्या विक्रीकरिता 27 जून रोजी संगणकीय प्रणाली मध्ये जे पात्र ठरतील त्या अर्जदारांसाठी ऑनलाईन बोलू स्वरूपातील ई लिलाव www.eauction.mhada.gov.in या वेबसाईटवर म्हणजे संकेतस्थळावर होणार असून या गाळ्यांच्या विक्रीकरिता संगणकीय प्रणाली मध्ये 27 जूनला सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नोंदणीकृत तसेच

अपेक्षित कागदपत्रे अपलोड केलेल्या व अनामत रकमेचा भरणा केलेल्या पात्र अर्जदारांकरिता ऑनलाईन बोली निश्चित करण्यात आली आहे. त्यासोबतच 28 जुन रोजी https://mhada.gov.inwww.eauction.mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळावर ई लिलावाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

कोणत्या ठिकाणी आहेत किती गाळे?

यामध्ये न्यू हिंदी मील, माझगाव येथे दोन, प्रतीक्षा नगर शिव 15, स्वदेशी मिल कुर्ला पाच, गव्हाणपाडा मुलुंड आठ, तुंगा पवई तीन, कोपरी – पवई पाच, मजासवाडी- जोगेश्वरी पूर्व एक, शास्त्रीनगर- गोरेगाव एक, बिंबिसार नगर – गोरेगाव पूर्व 17, चारकोप भूखंड क्रमांक एक 15, चारकोप भूखंड क्रमांक दोन 15, चारकोप भूखंड क्रमांक तीन चार, जुने मागोठाणे बोरिवली पूर्व 12, महावीर नगर कांदिवली पश्चिम 12, मालवणी मालाड 57 अशा पद्धतीने हे गाळे आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe