Ahmednagar Politics : आ. जगताप स्वतंत्र लढणार, जिल्हाभर भाजप-राष्ट्रवादी-माविआ तिरंगी लढती? कर्डीले-विखे पक्षाचे काम करणार की सोयऱ्याधायऱ्यांचे..

Updated on -

Ahmednagar Politics : विधानसभेसाठी आता राजकीय गणिते बरीचशी बदलेली दिसतील. त्या अनुशंघाने अहमदनगर जिल्ह्यातही मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याची तयारी सुरू केली आहे.

राज्यातील सहाही विभागांत आढावा बैठका घेण्यात येत असून, अहमदनगर जिल्ह्यातील बाराही जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी काल (दि.१७ जून ) दिली.  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या दौऱ्याबाबत आमदार संग्राम जगताप यांच्या संपर्क कार्यालयात सोमवारी पत्रकार परिषद झाली यावेळी ते बोलत होते.

अहमदनगर शहरात तिरंगी लढत
राष्ट्रवादीने जर एकला चलोची भूमिका घेतली तर मात्र तिरंगी लढती निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरात भाजपने आपलाच उमेदवार असावा अशी मागणी या आधीच केलेली आहे. जर राष्ट्रवादी स्वतंत्र लढले तर मात्र शहरात भाजप-राष्ट्रवादी-माविआ अशी तिरंगी लढत दिसेल.

आ. जगतापांविरोधात शहरात भाजपाचाही एक उमेदवार असेल व महाविकास आघाडीचाही एक उमेदवार असेल. म्हणजेच तिरंगी लढती होताना दिसतील.

जिल्ह्यातील १२ जागेंवर तिरंगी?
अहमदनगर जिल्ह्यातील बाराही जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी काल (दि.१७ जून ) दिली. याचा अर्थ मग जिल्ह्यातील सर्वच जागेंवर भाजप व शिंदे गट एकत्र तर महाविकास आघाडी व राष्ट्रवादी स्वतंत्र्य लढेल अशी स्थिती आहे. म्हणजेच जिल्ह्यातील १२ ही जागेंवर तिरंगी सामने होतील असे दिसते.

कर्डीले-विखे कुणाचे काम करणार?
जर तिरंगी लढती झाल्या तर मात्र खा. सुजय विखे व माजी आ. शिवाजी कर्डीले हे कुणाचे काम करतील अशा चर्चा सध्या सुरु झाल्यात. लोकसभेला विखेंयांचे मनापासून काम जगतापांनी केले आहे. त्याची परतफेड त्यांना विधानसभेला करावी लागेल. पण जर वेगवेगळे लढले तर विखे भाजपचे काम करतील की जगतापांचे? असा प्रश्न नागरिकांना पडलाय.

तर दुसरीकडे माजी आ. शिवाजी कर्डीले हे आपल्या जावयाचे अर्थात संग्राम जगतापांचे काम करतील की पक्षाचे असा देखील सवाल नागरिकांना पडलाय. जिल्ह्यातील राजकारण हे सोयऱ्याधायऱ्यांचे राजकारण म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आता आगामी विधानसभेला हे मातब्बर पक्षाचे काम की सोयऱ्याधायऱ्यांचे काम करणार हे येत्या काळात दिसेलच. दरम्यान या सर्व चर्चा असून आगामी काळात राष्ट्रवादी स्वतंत्र लढेल अशी शक्यता कालच्या पत्रकार परिषदेनंतर नागरिकांनी गृहीत धरलीये. जर महायुती शेवटपर्यंत अभेद्य राहिली तर मग हा प्रश्नच उद्भवत नाही.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठका
दि. १८ रोजी सकाळी नगर शहराची प्रथम बैठक होईल. त्यानंतर नगर दक्षिण जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. शहरातील वृदांवन लॉन येथे ही बैठक होणार असून या बैठकीत विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा होईल.

त्यानंतर खा. तटकरे हे श्रीरामपूर व नेवासा या दोन मतदारसंघाची श्रीरामपूर येथे बैठक घेतील. दुसऱ्या दिवशी दि. १९ रोजी कोपरगावमध्ये कोपरगाव व शिर्डी तर अकोले येथे अकोले व संगमनेर या दोन मतदारसंघाची बैठक होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe