Ahmednagar Breaking : बँक अधिकाऱ्याकडूनच व्यावसायिकाची ३६ लाखांची फसवणूक, ‘या’ बँकेतील गैरप्रकार चव्हाट्यावर

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar Breaking : विविध पतसंस्थांमध्ये, मल्टिस्टेटमध्ये अनेक फसवणुकीचे प्रकार समोर आलेहेत. अहमदनगरजिल्ह्यातील अनेक पतसंस्थांचे गैरकारभार देखील चव्हाट्यावर आले. परंतु आता एका नामांकित बँकेतील गैरकारभार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियातील तत्कालीन शाखा मॅनेजरने हा गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. नगर शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन शाखा मॅनेजर यांनी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून खातेदार संजय रोकडे या व्यवयसायिकाच्या ओव्हरड्राप्ट अकाउंटमधून त्याचे सही नसलेले धनादेश व बनावट कागदपत्रे वापरून सुमारे ३६ लाखांची फसवणूक केली.

याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश दत्तात्रय सावंत (तत्कालीन शाखा व्यवस्थापक, बारातोटी कारंजा नगर, रा. सेंट्रल बँक कॉलनी, सूतगिरणी रोड, श्रीरामपूर), सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बारातोटी कारंजा नगर शाखेतील कर्मचारी यांचा आरोर्पीमध्ये समावेश आहे.

सन २०१३ ते २०१९ या काळात माळीवाडा परिसरातील बारातोटी कारंजा शाखेत ही घटना घडल्याची माहिती समजली आहे. संजय सुदाम रोकडे (वय ४८, रा. कोहीनूर मंगल कार्यालयासमोर, गुलमोहर रोड) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

याबाबत संजय सुदाम रोकडे (रा. कोहिनूर मंगल कार्यालयासमोर, नगर) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, वरील आरोपींनी संगनमत करून २०१३ ते १११९ दरम्यानच्या काळात ओव्हरड्राप्ट खात्यातून वेळोवेळी सहीचे व सही नसलेले चेक वापरले. ओ.डी खाते थकबाकीत असतानाही देखील धनादेश स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता वटवून रक्कम काढून घेतली.

तसेच वेळोवेळी ओ.डी. खात्यात वाढ करून संजय रोकडे यांचे कर्ज सुरू असतानाही देखील यातील आरोपी प्रकाश सावंत याने ना हरकत प्रमाणपत्र खोटे बनवून देऊन विश्वास संपादन करून बनावट दस्तऐवज तयार करून ३६ लाख परस्पर काढून फसवणूक केली. याबाबत संजय रोकडे यांनी आरोपी प्रकाश सावंत यांना विचारणा केली असता त्यांना धमकी दिली.

तू जर माझ्या गैरव्यवहाराची कोठे वाचता केली तर, मी माझ्याविरुद्ध अॅट्रॉसिटीची तक्रार करेन अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले. पोलिसांनी अर्जाची चौकशी करून गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe