MSC Bank Bharti 2024 : पदवीधर उमेदवारांना महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत मिळणार नोकरी, जाहिरात प्रसिद्ध…

Content Team
Published:
MSC Bank Bharti 2024

MSC Bank Bharti 2024 : जर तुम्ही सध्या बँकेत नोकरी शोधत असाल आणि मुंबईत स्थित असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची आहे. सध्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज कशाप्रकारे करता येतील जाणून घेऊया…

वरील भरती अंतर्गत “सहकारी इंटर्न “ पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे. लक्षात घ्या उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता

MBA or Post Graduation in relevant Field

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबईत सुरु आहे.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई आणि महाराष्ट्रातील जिल्हा केंद्रीय सहकारी बँक या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.mscbank.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe