Nashik Bharti : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळात निघाली भरती, ‘या’ तारखेला होणार मुलाखत…

Published on -

Nashik Shikshan Prasarak Mandal : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील नाशिक मध्ये स्थित असाल आणि चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे.

वरील भरती अंतर्गत “प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक, लिपिक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 19 जून 2024 असून, उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्जासह मुलाखतीस हजर राहायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी पदवीधर पद्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

नोकरी ठिकाण

ही भरती नाशिक मध्ये होणार आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

मुलाखतीसाठी जु. स. रुंगटा हायस्कूल, अशोकस्तंभ, नाशिक या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

मुलाखत उद्या म्हणजे 19 जून 2024 रोजी घेण्यात येणार आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.nspmandal.org/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-उमेदवारांनी लक्षात घ्या केवळ पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.

-सदर पदांकरिता मुलाखती 19 जून 2024 रोजी घेण्यात येणार आहे.

-उमेदवारांनी अर्जासह तसेच कागदपत्रांसह मुलाखतीस हजर राहायचे आहे.

-मुलाखती येण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News