Ahmednagar Politics : श्रीगोंदेत पाचपुतेंच ठरलं ! आमदारकीला उलथापालथ होणार

Published on -

Ahmednagar Politics : विधानसभेची आता जोरदार तयारी सुरु झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात अनेक मतदार संघात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी बहुरंगी लढती देखील दिसतील. श्रीगोंदे मतदार संघात देखील राजकीय उलथापालथ होईल असे चित्र आहे.

साजन पाचपुते ठाकरे गटाकडून ?
श्रीगोंदे मतदार संघ हा महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे गटाकडेच येईल असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते यांनी केलाय. व ही विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची घोषणाच त्यांनी केलीये. शिवसेना ठाकरे गटाचा ५८ व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले पाचपुते
स्व. सदाअण्णा पाचपुते यांनी श्रीगोंदा तालुक्यात केलेले काम सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे कोणी कितीही ताकद लावली तरी सामान्य जनता माझ्याबरोबर आहे. त्यांना न्याय देण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहे. विधानसभा निवडणुकीत मोठा स्पर्धक तयार झाल्यामुळे मला बदनाम करण्यासाठी काहींचे षडयंत्र चालू आहे.

पण कोणालाही घाबरणार नाही. श्रीगोंदा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे. कोणाचे कार्यकर्ते फोडून पक्षसंघटना वाढवायची नाही. तळागाळातील सामान्य लोकांची कामे करुन पुढे येणाऱ्यांना घडवायचे आहे. पक्षात कोणावरही अन्याय होणार नाही.

यापुढे तालुक्यात ग्रामपंचायत, सेवा संस्था निवडणुकांत सर्वांना ताकद देण्यासाठी बांधिल राहील. आमच्या घरात चाळीस वर्षे आमदारकी आहे. पण त्याचे मला महत्त्व वाटत नाही. तालुक्यात भगवा फडकावयाचा आहे. स्व. सदाअण्णांचा मुलगा म्हणून मला संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले.

पाचपुते विरुद्ध पाचपुते ?
जर साजन पाचपुते यांना उमेदवारी मिळाली व भाजपने स्टँडिंग आमदार म्हणून बबन पाचपुते यांना किंवा घरात कुणाला आमदारकीचे तिकीट दिले तर श्रीगोंदेत पाचपुते विरुद्ध पाचपुते अशी फाईट पाहायला मिळेल. यामुळे मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News