Ahmednagar News :शेअर मार्केटचा विळखा घट्ट होतोय ; आठवड्यात ३० लाखांचा गंडा

Published on -

Ahmednagar News : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातीळ अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

या तालुक्यातील जवळपास सर्वच खेडेगावातून करोडोची माया जमवत यातील काही एजंट आता फरार झाले आहेत. या घटनेमुळे अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडालेली असतानाच शहरात देखील एकाच आठवड्यात फसवणूकीचे तब्बल तीन गुन्हे दाखल झाले आहेत. या तिन्ही घटनेत एकूण २८ ते २९ लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

शहरातील व्यावसायिक राजीव अनंत सहस्रबुध्दे (वय ५३, रा. सिध्दीविनायक सोसायटी, सावेडी) यांची १५ लाख ५५ हजारांची फसवणूक झाल्याचा गुन्हा सायबर पोलिस ठाण्यात दाखल झालेला आहे. प्रकाश दत्तात्रय कुकडे (रा. शिवम विहार, शिंदे मळा, सावेडी) या सेवानिवृत्त व्यक्तीची ६६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल आहे.

आता संदीप बाबुराव कोठुळे यांची ११ लाख २० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप बाबुराव कोठुळे (रा. साखर कारखाना कामगार वसाहत, श्री शिवाजीनगर, राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एच आर श्रीकांत, धर्मेंद्रसिंग सेगर (दोघे रा. भोपाल, मध्य प्रदेश), दिनेश योगेश भटनागर (रा. पिंपळे निलख, पुणे), साजिद शेख (रा. कोंढवा, पुणे) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या चौघांच्या टोळीने शहरात व डिसेंबर २०२१ मध्ये शेअर मार्केट फोरेक्स मार्केट बाबत सेमिनार आयोजित केले होते. या सेमिनार मध्ये फिर्यादी कोठुळे यांच्या सह शहर व जिल्ह्यातून अनेकजण सहभागी झाले होते. सुरुवातीला सर्वांना शेअर ट्रेडिंग बाबत माहिती दिली.तसेच त्यांच्या एक कार्यालयही पुणे FRAUD येथे सुरु करून सर्वांना त्याचा पत्ता दिला.

फिर्यादी व इतरांना शेअर ट्रेडिंग बाबत माहिती देत कशाप्रकारे गुंतवणूक केल्यास अधिक नफा भेटू शकेल अशी माहिती देत सर्वांचा विश्वास संपादन केला. कोठुळे यांच्या प्रमाणेच अनेक गुंतवणूकदारांनी या टोळीला लाखो रुपये दिले. मात्र अनेक दिवस उलटूनही नफा तर सोडाच गुंतवलेले पैसेही अद्याप मिळाले नाहीत.ते मिळवण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु त्याला यश मिळाले नाही. त्यामुळे शेवटी कोठुळे यांनी पोलिसात फिर्याद दिली.

मागील काही वर्षांपासून शेअर मार्केटचा हा व्यवसाय अनेक खेडोपाडी सुरू झाला. यात अनेक एजंट्स तयार झाले, या एजंट्सने दाखवलेल्या आमिषाला बळी पडून लोकांनी कोट्यवधी रुपये जमा केले होते. या एजंट्सने सुरुवातीला लोकांना परतावा दिला.

नंतर मात्र हेच एजंट्स आपल्या संपूर्ण कुटुंबासह गावातून पळून गेले आहेत. मागील ४ वर्षांपासून हा गोरखधंदा शेवगाव तालुक्यात सुरू असून जवळपास एक हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याचे बोलले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News