Crop Insurance: 1 रुपयात पिक विमा घ्या आणि मिळवा 20 हजारापासून ते 80 हजार रुपयांपर्यंत भरपाई! वाचा कोणत्या पिकासाठी किती मिळेल विमा भरपाई?

Ajay Patil
Published:
pik vima

Crop Insurance:- विविध नैसर्गिक आपत्ती जसे की गारपीट, अवकाळी पाऊस तसेच वादळी वारे, अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व शेतकरी बांधवांना खूप मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांना अशा नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीमध्ये आर्थिक मदत किंवा आर्थिक आधार मिळावा याकरिता प्रधानमंत्री पिक विमा योजना ही खूप महत्त्वाची योजना आहे.

योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकांचा विमा एक रुपयात उतरवता किंवा भरता येतो व बाकीचा खर्च हा सरकारच्या माध्यमातून केला जातो. नुकतेच आता खरीप हंगामासाठी पिक विमा भरायला 19 तारखेपासून म्हणजेच बुधवारपासून सुरुवात झाली असून यामध्ये 14 पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे.

 एक रुपयात पिक विमा घ्या आणि 20000 ते 80 हजार रुपयापर्यंत भरपाई मिळवा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून खरीप हंगामाकरिता पिक विमा भरायला बुधवार म्हणजे 19 तारखेपासून सुरुवात झाली असून या खरीप हंगामामध्ये भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर,मूग, उडीद तसेच बाजरी, मका, नाचणी, भुईमूग, तीळ, इत्यादी 14 पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे.

या खरीप हंगामाकरिता विमा भरण्याची शेवटची तारीख 15 जुलै आहे. या तारखेपूर्वी शेतकऱ्यांनी पिकांचा विमा भरणे गरजेचे आहे. तसेच जे शेतकरी कुळाने अथवा भाड्याने शेती करतात अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेत सहभागी होता येणार आहे.

पिक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेतील सहभाग ऐच्छिक असणार आहे. जे शेतकरी भाडेपट्ट्याने शेती करत असतील अशा शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टलवर नोंदणी करताना भाडेकरार अपलोड करणे बंधनकारक आहे व शेतामध्ये लागवड केलेल्या पिकांची नोंद ही पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून करावी.

 ही कागदपत्रे आवश्यक

पिक विमा भरण्याकरिता सातबारा उतारा, बँकेचे पासबुक तसेच आधार कार्ड व पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र गरजेचे आहे. तसेच अर्जदाराचा आधार क्रमांक व पिक विम्यातील अर्ज भरताना आधार कार्डवर ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणेच नाव लिहावे व बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे.

कारण जर नुकसान भरपाई केंद्र सरकारच्या माध्यमातून आली तर ती केंद्र सरकारच्या विमा पोर्टलद्वारे आधार लिंक असलेल्या बँक खात्यातच क्रेडिट होईल. बँक खात्यातील नाव आणि आधार कार्ड वरील नाव देखील सारखे असणे गरजेचे आहे.

 पिकनिहाय मिळणारी हेक्टरी विमा रक्कम

भात 40000 ते 51 हजार 760, ज्वारी 20000 ते 32 हजार 500, बाजरी 8000 ते 33 हजार 913, नाचणी 13750 ते 20000, मका 6000 ते 35 हजार 598, तुर 25000 ते 36 हजार 802, मुग 20000 ते 25 हजार 817, उडीद वीस हजार ते 26 हजार 25, भुईमूग 29 हजार ते 42 हजार 971, सोयाबीन 31 हजार 250 ते 57 हजार 267, तीळ 22000 ते 25000, कारळे 13750, कापूस तेवीस हजार ते 59 हजार 983 आणि कांदा शेचाळीस हजार ते 81422

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe