Tata कंपनीचा जलवा ! ‘या’ SUV कारने मोडलेत अनेक विक्रम, 150 दिवसात 13,000 युनिटची विक्री; गाडीचे फीचर्स आणि किंमत पहा…

Tejas B Shelar
Published:
Tata New SUV

Tata New SUV : टाटा ही भारतातील एक लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी आहे. ही ऑटो कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये एक जायंट किलर म्हणून उदयास आली आहे. कंपनीचा इलेक्ट्रिक सेगमेंट चा पोर्टफोलिओ हा खूपच स्ट्रॉंग आहे. या सेगमेंटमध्ये टाटा कंपनीचा अजूनपर्यंत कोणी हात धरलेला नाही. या सेगमेंटमध्ये सर्वाधिक कार या टाटा कंपनीच्याच आहेत.

दरम्यान टाटा कंपनीची एक इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च झाल्यापासून भारतीय बाजारात धुमाकूळ घालत आहे. अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच 150 दिवसात या टाटा कंपनीच्या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे तब्बल 13000 युनिट विकले गेले आहेत.

निश्चितच हा माइल स्टोन कंपनीसाठी खूपच फायद्याचा ठरणार आहे. विशेष म्हणजे कंपनीची ही SUV शहरी त्याबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात विकली जात आहे.

कोणती आहे ती इलेक्ट्रिक एसयूव्ही

टाटा मोटर्सच्या टाटा पंच EV या अलीकडेच लॉन्च झालेल्या SUV ने ही कामगिरी केली आहे. यावरून या गाडीची लोकप्रियता आपल्या लक्षात येते. पाच महिन्यांच्या कालावधीत या इलेक्ट्रिक गाडीचे 13000 युनिट विकले गेले आहेत.

कंपनीच्या टोटल इलेक्ट्रिक व्हेईकल्स सेल्स मध्ये या गाडीचा शेअर हा तब्बल 41 टक्के आहे. या इलेक्ट्रिक व्हेईकलच्या एकूण सेल्सपैकी 36 टक्के हिस्सा हा ग्रामीण भागाचा आहे. म्हणजे ग्रामीण भागातही या गाडीची पॉप्युलॅरिटी आहे.

पुणे, बेंगलोर, जयपुर, तिरुवनंतपुरम यांसारख्या शहरांमध्ये या गाडीला चांगली मागणी असल्याची आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान आता आपण या गाडीचे फिचर्स आणि किंमतीबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.

कसे आहेत फीचर्स आणि किंमत

या पॉप्युलर एसयूव्हीची डिझाईन ही कंपनीच्याच Nexon EV च्या डिझाईनवर आधारित आहे. या कंपनीच्या अलीकडेच बाजारात दाखल झालेल्या SUV ला एलईडी लाइट बार मिळतो. याच्या फ्रंट बंपरमध्ये इंटिग्रेटेड स्प्लिट एलईडी हेडलाइट्स, उभ्या स्ट्रोकसह रीडिझाइन केलेले लोअर बंपर आणि सिल्व्हर फॉक्स स्किड प्लेट समाविष्ट आहेत.

मागील बाजूस, पंच EV मध्ये त्याच्या ICE मॉडेलप्रमाणे टेललाइट डिझाइन आहे. ज्यामध्ये Y-आकाराचे ब्रेक लाईट्स, रूफ-माउंटेड स्पॉयलर आणि बंपर डिझाइनचा समावेश आहे. साइड प्रोफाइलमध्ये आता 16-इंच डायमंड-कट अलॉय व्हील आणि सर्व चाकांवर डिस्क ब्रेक समाविष्ट आहेत.

ही गाडी दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये बाजारात लॉन्च करण्यात आली आहे. 25 kWh आणि 35 kWh अशा दोन बॅटरी पॅक मध्ये ही गाडी उपलब्ध होते. यामध्ये 7.2 kW फास्ट होम चार्जर (LR प्रकारासाठी) आणि 3.3 kW वॉलबॉक्स चार्जरचा समावेश आहे.

25 kWh बॅटरी पॅकचे मॉडेल 421Km ची रेंज देण्यास सक्षम आहे आणि 35 kWh बॅटरी पॅकचे मॉडेल हे 315Km ची रेंज देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. किमतीबाबत बोलायचं झालं तर या गाडीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ही 10.99 लाख रुपये एवढी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe