पर्यटन बेतले जीवावर; शिर्डीच्या तरूणाचा भंडारदरा धरणात बुडून मृत्यू

Published on -

Ahmednagar News : भंडारदरा धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका २६ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सद्दाम शेख,( रा.पूनमनगर, शिर्डी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भंडारदरा परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करत असतात. आज शिर्डी परिसरातील सहा तरुण भंडारदरा येथे पर्यटनासाठी आले होते. फिरत असताना सकाळी साडेदहाच्या सुमारास मुतखेलच्या बाजूला धरणावर हे तरुण आले.

या सहापैकी तीन जण आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरले. या ठिकाणी असलेल्या पाण्याचा अंदाज या तरुणांना आला नाही. त्यात शेख याचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाला. पोहता येत नसल्याने शेख याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक आणि मदत कार्य घटनास्थळी पोहोचले. शेख याचा मृतदेह पाण्यातून वर काढण्यात आला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पावसाळ्यात राज्यभरातील अनेक पर्यटक पर्यटनासाठी अकोले तालुक्यात येत असतात. अद्याप तालुक्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. मात्र थोड्या फार झालेल्या पावसाने परिसर हिरवागार झाला आहे.

त्यामुळे या निसर्ग सृष्टीचा आनंद घेण्यासाठी तसेच येथील भंडारदरा धरण परिसरात फिरण्यासाठी सध्या अनेक पर्यटक या भागात येत आहेत. दरम्यान शनिवारी शिर्डी परिसरातील सहा तरुण भंडारदरा धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. दुपारी सव्वा दन वाजण्याच्या सुमारास ते धरणाच्या पाण्यात उतरले असता त्यातील एक जण पाण्यात बुडाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe