उभ्या असलेल्या वाहनातून ६० हजारांचे कांदा बियाणे चोरीला ; नगर शहरातील घटना

Published on -

Ahmednagar News : सध्या जिल्ह्यात मान्सूनचा जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत आहेत. सोयाबीन ,मुग, तूर, लाल कांदा, कापूस आदी बियाणे खरेदी करून पेरणीची लगबग सुरु आहे.

मात्र नेमकं याच काळात भुरट्या चोरटयांनी आता या बियाणांवरच हात साफ करण्याचा धडका लावला आहे. नुकतेच शेवगाव तालुक्यात एकाच दिवशी चार दुकाने फोडून सोयाबीन, कापूस, कांदा असे मोठ्या रकमेचे बियाणे चोरून नेले होते. या घटनेचे लोन आता नगर शहरात देखील पसरले आहे.

कारण येथे देखील दोन वेगवेगळ्या घटनेत ५८ हजारांचे कांद्याचे बियाणे चोरीला गेले आहेत. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात पहिली घटना माळीवाड्यातील वसंत टॉकीज रस्त्यावर घडली. यात फिर्यादी अरबाज निसार शेख (वय २६ रा. गाझीनगर, काटवन खंडोबा, – नगर) यांनी शुक्रवारी (२१ जून) – दुपारी त्यांच्या – ताब्यातील टेम्पो माळीवाडा – भागातील वसंत टॉकीज रस्त्यावर अरिहंत ड्रायफ्रूट दुकानासमोर – उभा केला होता. या दरम्यान अज्ञात चोरट्याने या टेम्पोतून २८ हजार ५०० रुपयांचे येलोरा कंपनीचे कांदा बियाणे चोरून नेले. त्यामध्ये ३० पाकीट बियाणे होते. या प्रकरणी शेख यांनी शनिवारी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरी घटना मार्केटयार्ड परिसरात घडली.

यात पारनेर तालुक्यातील म्हसणे येथील गणेश सुखदेव दळवी हे शनिवारी सायंकाळी मार्केटयार्ड येथे वाहन (एमएच १६ सीसी ४७२८) हे वाहन पार्क केले व बावीस्कर टेक्नोलॉजी, कृषी सेवा केंद्रात कृषी माल ताब्यात घेण्यासाठी गेले होते.

दरम्यान अज्ञात चोरट्याने दळवी यांच्या वाहनातून ३० हजार रूपये किमतीची येलोरा कंपनीची कांदा बियाणे असलेला नॉर्थ बॉक्स चोरून नेला. त्यामध्ये ३० पाकीट बियाणे होते. या प्रकरणी दळवी यांनी तात्काळ कोतवाली पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. या दोन्ही घटनात एकूण ५८ हजारांचे कांद्याचे बियाणे चोरीला गेले आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News