थरार ! नगर येथून बालकास पळवले, पोलिसांची शोधाशोध, अखेर..

अहमदनगर रेल्वे स्टेशन परिसरातून पळविलेल्या अकरा महिन्याच्या बालकाचा शोध घेण्यात पोलिसांना अखेर यश आले. सदर बालक तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरात सापडले असून त्याला त्याच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी एका जणाला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, (दि.२३) जून रात्री एक वाजेच्या सुमारास अहमदनगर रेल्वे पोलीस स्टेशन परिसरातून एका महिलेने स्वानंद आकाश खडसे (वय ११ महिने) या बालकाला पळवून नेले होते. सदर बालक संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरात असल्याची माहिती नगरच्या पोलिसांना समजली.

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर रेल्वे स्टेशन परिसरातून पळविलेल्या अकरा महिन्याच्या बालकाचा शोध घेण्यात पोलिसांना अखेर यश आले. सदर बालक तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरात सापडले असून त्याला त्याच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याप्रकरणी एका जणाला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, (दि.२३) जून रात्री एक वाजेच्या सुमारास अहमदनगर रेल्वे पोलीस स्टेशन परिसरातून एका महिलेने स्वानंद आकाश खडसे (वय ११ महिने) या बालकाला पळवून नेले होते. सदर बालक संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरात असल्याची माहिती नगरच्या पोलिसांना समजली.

अहमदनगर रेल्वे पोलीस उपनिरीक्षक एस.जी. लोनकर व त्यांच्या सोबतचे कर्मचारी यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशनला येवून संगमनेर शहर पोलिसांना याची माहिती दिली. या प्रसंगाचे गांभिर्य ओळखून शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचे दोन तपास पथक तयार करण्यात आले.

पोलीस पथकाने रेल्वे पोलीस यांना सोबत घेवून समांतर तपास करत बालकास नवनाथ विष्णू धोत्रे (रा. गुंजाळवाडी शिवार, ता. संगमनेर) यांच्या राहते घरातून ताब्यात घेण्यात आले. या बालकास त्याचे पालकांचे ताब्यात देण्यात आले असून नवनाथ विष्णु धोत्रे यास पुढील कारवाई कामी अहमदनगर रेल्वे पोलीस हे सोबत घेवून गेले आहे.

सदर कारवाई शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नितीन चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ, पो.हे.कॉ गोविंद मोरे, पो.हे.कॉ. राजु झोले, पो.हे.कॉ. अशोक पारधी, पो.ना. पांडुरंग पटेकर, पो.कॉ. अजित कुन्हे, पो.कॉ. शितल बहिरट व अहमदनगर रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस.जी. लोणकर,

पो.हे.कॉ बी. आर. गौळी, पो.कॉ. पी.बी. गडाख, पो.ना. इरफान शेख, पो कॉ. देशमुख, पो.कॉ. अविनाश खरपास, पो.कॉ. आसाराम येवले, पो.कॉ. किरण तोरमल, मंगल आहेर, म.पो.कॉ. वनिता समिदर यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News