बऱ्याचदा आपल्याकडे दहा रुपयापासून तर अगदी पाचशे रुपये पर्यंतच्या अशा नोटा असतात की त्या एकतर अर्ध्यापर्यंत फाटलेली असतात किंवा त्यांची पूर्ण दोन तुकडे तरी झालेले असतात किंवा जीर्ण झालेली असते किंवा एका कुठलातरी बाजूवर फाटलेली तरी असते. अशावेळी बऱ्याचदा आपण या नोटा घरात कुठेतरी ठेवून देतो किंवा फेकून तरी देतो.
परंतु अशा प्रकारच्या नोटा जर तुम्ही बँकेमध्ये जमा केल्या तर तुम्हाला त्या नोटांच्या बदल्यात पूर्ण रक्कम देखील मिळू शकते. या बाबतीत रिझर्व बँक ऑफ इंडियाचे काही नियम आहेत व ते देखील आपल्याला माहीत असणे तितकेच गरजेचे आहे. या अनुषंगाने या लेखात आपण याबद्दलचे नियम जाणून घेणार आहोत.
फाटलेल्या नोटा बँकेत जमा करण्याचे काय आहेत नियम?
रिझर्व बँक ऑफ इंडियाने ज्या नोटा बदलता येतील अशा नोटांच्या संबंधित चार वेगवेगळ्या श्रेणी केलेले आहेत. यामध्ये एखादया नोटेचे जर दोन तुकडे झाले असतील तर अशा नोटेला विकृत नोट म्हटले जाते.
तसेच या विकृत नोटांच्या श्रेणीमध्ये ज्या नोटांचा एक भाग हरवला आहे अशा नोटांचा सुद्धा समावेश होतो. अशा प्रकारच्या विकृत नोटांची स्थिती कशा प्रकारची आहे यावरून नोट जमा केल्यावर किती पैसे तुम्हाला मिळू शकतात हे प्रामुख्याने अवलंबून असते. यामध्ये प्रामुख्याने…
1- 50 रुपयापेक्षा कमी किमतीची नोट असेल तर– समजा तुमच्याकडे 20 रुपये, दहा रुपये किंवा पाच रुपया किंवा त्यापेक्षा सुद्धा कमी किमतीची नोट असेल तर अशा स्थितीमध्ये तुम्हाला एका अटीवर पूर्ण रक्कम मिळू शकते. यामध्ये प्रामुख्याने दोन अथवा जास्त भागांमध्ये विभागलेल्या नोटेचा मोठा भाग 50% अथवा त्यापेक्षा मोठा असावा.
तरच तुम्हाला बँकेकडून अशा नोटेच्या बदली पूर्ण रक्कम मिळते. याबाबतीत रिझर्व बँक ऑफ इंडियाचे काही नियम तसेच कायदे असून त्यांचाच आधारावर नोटेचा सर्वात मोठा भाग किती टक्के आहे हे ठरवले जाते. नोटेचा मोठा भाग 50 टक्के पेक्षा कमी असेल तर त्या नोटेचा क्लेम बँकेकडून रिजेक्ट सुद्धा होण्याची शक्यता असते.
2- पन्नास रुपयापेक्षा जास्त किमतीची नोट असेल तर– तुमच्याकडे 50 रुपये किंवा त्यापेक्षा मोठ्या मूल्याची नोट असेल तर अशा नोटेचे दोन अथवा जास्त भाग झाले असतील तर त्याकरिता वेगळे नियम आहेत.अशा नोटेचे जर दोन तुकडे झालेले असतील म्हणजेच दोन भाग झालेले असतील तर पूर्ण पैसे मिळतात. परंतु त्या नोटेचा मोठा भाग 80% पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
समजा यामध्ये विकृत नोटेचा म्हणजेच दोन तुकडे झालेल्या नोटेचा एक भाग 40% पेक्षा जास्त असेल आणि 80% पेक्षा कमी असेल तर अशा नोटेजवर निम्मे मूल्य मिळते. म्हणजेच पाचशे रुपयाची नोट असेल तर तुम्हाला 250 रुपये मिळतील. परंतु यामध्ये जर नोटेचा मोठा भाग 40% पेक्षा कमी आहे तर बँक अशा प्रकारचे नोट एक्सचेंज करायला तुम्हाला नकार देखील देऊ शकते किंवा तुमचा क्लेम रिजेक्ट करू शकते.