Reliance Jio : तुम्ही देखील रिलायन्स जिओचे वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. रिलायन्स जिओने आपल्या करोडो ग्राहकांना धक्का दिला आहे. कपंनी आपले प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन महाग करणार आहे आणि त्याची अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे.
जिओने आपले विद्यमान लोकप्रिय प्लॅन पूर्वीपेक्षा महाग करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन किंमत 3 जुलैपासून लागू होणार आहे. कपंनीचे कोणते प्लॅन महाग होणार आहेत पाहूया…
जिओने आपल्या सर्वात स्वस्त 155 रुपयांच्या प्लॅनची किंमत 189 रुपयांपर्यंत वाढवली आहे, ही विद्ध 22 टक्के करण्यात आली आहे. रिलायन्स जिओने त्यांच्या 19 प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत, त्यापैकी 17 प्रीपेड आणि दोन पोस्टपेड प्लॅन आहे
जिओच्या 209 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची किंमत आता 249 रुपये झाली आहे आणि त्याची वैधता 28 दिवस असेल. 239 रुपयांचा प्लॅन आता 299 रुपयांचा झाला असून त्याची वैधता 28 दिवसांची असेल. तर 299 रुपयांचा प्लॅन आता 349 रुपयांवर महागला आहे. 349 रुपये, 399 रुपये आणि 479 रुपयांच्या प्लॅनची किंमत आता अनुक्रमे 399, 449 आणि 579 रुपये झाली आहे.
जिओचे दोन पोस्टपेड प्लॅनही महाग झाले आहेत. 30GB डेटा प्रदान करणाऱ्या 299 रुपयांच्या प्लॅनची किंमत आता 349 रुपये आहे. त्यामुळे 75GB डेटासह 399 रुपयांच्या प्लॅनची किंमत आता 449 रुपये झाली आहे.