Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून ब्लॅकमेलिंग संदर्भात एक मोठे वृत्त आले आहे. एका माजी आमदाराला तथाकथित पत्रकाराने तब्बल एक कोटी २५ हजारांची मागणी करत ब्लॅकमेलिंग केल्याचे समोर आले आहे.
आमच्याकडे अश्लील व्हिडीओ असून ते व्हायरल करायचे नसतील तर एक कोटी २५ हजार रुपये लागतील असे या पत्रकाराने म्हटले होते. दरम्यान आता या माजी आमदाराने पोलिसांत धाव घेतली असून या पत्रकारावर गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी : वेब पोर्टल व युट्युब चॅनेल असणारा एक तथाकथित पत्रकार आहे. त्याने माजी आमदाराला गाठले. तुमचे अश्लील व्हिडीओ आमच्याकडे आहेत.
ते व्हायरल करायचे नसतील तर १ कोटी २५ हजार रुपये लागतील असे सांगत ब्लॅकमेलिंग केले. त्या माजी आमदाराने २५ हजार रुपये देखील दिले.
परंतु पैशांचा तगादा होऊ लागल्याने त्याने थेट कोतवाली पोलिसांत धाव घेतली. त्याच्या फिर्यादीवरून त्या पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगरमधील इसमांकडून बीडच्या आमदाराला ब्लॅकमेलिंग
बीडचे एक माजी आमदार आहेत. त्यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी या लोकांनी दिली होती. दरम्यान या प्रकरणामध्ये अहमदनगर येथील 2 महिलांसह 3 जण आरोपी आहेत. या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या आरोपींमध्ये तथाकथित एका पत्रकाराचा देखील समावेश असल्याची माहिती समजली आहे. हा गुन्हा जानेवारी ते 26 जून दरम्यान घडला असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे.