सध्या अगदी मजुरांपासून तर श्रीमंत लोकांचे बँकांमध्ये खाते असतात व प्रामुख्याने या खात्यांमध्ये बचत खात्यांचे प्रमाण जास्त आहे. आपण नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून जो काही पैसा कमवतो तो बऱ्याचदा बँकांमध्ये उघडलेल्या सेविंग अकाउंट मध्ये म्हणजेच बचत खात्यामध्ये ठेवतो. परंतु अशा पद्धतीने बचत खात्यामध्ये तुम्ही किती रक्कम किंवा किती पैसे एका वेळेस ठेवू शकतात याबाबत देखील रिझर्व बँक ऑफ इंडियाचे काही नियम आहेत.
त्यामुळे या नियमाला धरूनच तुम्ही बचत खात्यामध्ये पैसे ठेवणे गरजेचे आहे. तसेच जी आताची तरुण पिढी आहे ते आता मोठ्या प्रमाणावर बँकांमध्ये पैसे ठेवतात. तसे पाहायला गेले तर बचत खात्यामध्ये पैसे ठेवणे हे पैशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वाचे आहे व यामध्ये ठेवलेल्या पैशांवर तुम्हाला व्याज देखील मिळते.
बचत खात्यामध्ये तुम्ही किती पैसे ठेवू शकतात? वाचा रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नियम
भारतामध्ये आता प्रत्येकाचे बँकांमध्ये सेविंग अकाउंट म्हणजेच बचत खाते असून प्रत्येकजण यामध्ये पैसा बचत म्हणून ठेवत असतात. परंतु यामध्ये तुम्हाला माहिती असायला हवी की तुम्ही एकावेळी बँकेच्या या बचत खात्यात किती पैसे ठेवू शकतात. तसे पाहायला गेले तर याकरिता कुठल्याही प्रकारची मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.
तुम्हाला हवे असेल तितका पैसा तुम्ही तुमच्या बँकेतील सेविंग अकाउंटमध्ये ठेवू शकतात. परंतु तुम्ही जे काही पैसे तुमच्या बँकेच्या बचत खात्यात ठेवत आहात ते पैसे किंवा ती रक्कम इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये यायला नको. समजा तुम्ही जर एका आर्थिक वर्षांमध्ये दहा लाख रुपये पेक्षा जास्त रक्कम बँक अकाउंटमध्ये जमा करत असाल तर त्या रकमेची संपूर्ण माहिती तुम्ही सेंट्रल बँक ऑफ डायरेक्ट टॅक्स ला देणे गरजेचे आहे.
यासंबंधीची संपूर्ण अधिकृत माहिती तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देणे गरजेचे आहे व या कमाईचा स्त्रोत देखील इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सांगणे महत्त्वाचे आहे. यासोबतच तुम्ही एफडीमध्ये डिपॉझिट केली असेल किंवा बॉण्ड घेतले असतील त्याशिवाय म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक देखील या नियमात लागू होते.
तुम्ही जर तुमच्या बचत खात्यामध्ये दहा लाख रुपये पेक्षा जास्त पैसे ठेवले असाल तर आमच्याकडे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्यासंबंधीचा सगळे माहिती किंवा रिपोर्ट मागू शकते.
तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिलेले उत्तराने जर त्यांचे समाधान झाले तर ठीक नाहीतर तुमची इन्कम टॅक्स डिपार्टमेंट चौकशी देखील करू शकते. जर चौकशीमध्ये काही चुका आढळल्या तर तुम्हाला दंड देखील भरावा लागू शकतो. प्रसंगी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जमा केलेल्या रकमेवर 60% टॅक्स पंचवीस टक्के सरचार्ज आणि चार टक्के प्लस चार्ज यामध्ये तुम्हाला लागू करू शकते.
बँकेच्या बचत खात्यामध्ये पैसे ठेवणे फायद्याचे आहे की तोट्याचे?
1- सगळ्यात महत्वाचे म्हणजे बचत खात्यामध्ये मोठी रक्कम ठेवण्याला काही अर्थ नाही. या ऐवजी तुम्ही तुमच्याकडे असलेले पैसे शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंड यामध्ये गुंतवू शकतात. या माध्यमातून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.
2- तुम्हाला गुंतवणुकीवर कुठल्याही प्रकारची जोखीम घ्यायची नसेल तर तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवणे फायद्याचे ठरेल.
3- परंतु तुम्हाला जोखीम घ्यायची नाही आणि पैसे देखील जास्त मिळवायचे आहेत तर तुम्ही कुठलीही जोखीम न घेता बँक बचत खात्यामध्ये पैसे ठेवण्यापेक्षा ते पैसे फिक्स डिपॉझिट करू शकतात. कारण बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट करणे हे सुरक्षित मानले जाते व या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देखील मिळतो.