शेअर बाजाराचा नाद लागला अन वजनदार घरातील तरुण अट्टल चोर झाला, अहमदनगरमधील कथा..

सध्या शेअर मार्केट मधील फसवणुकीचे लोन चांगलेच पसरले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात असले प्रकार घडले आहेत. दरम्यान आता या शेअर मार्केटच्या नादाने एका तरुणाला चोर बनवले असल्याचे समोर आले आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
chor

Ahmednagar News : सध्या शेअर मार्केट मधील फसवणुकीचे लोन चांगलेच पसरले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात असले प्रकार घडले आहेत. दरम्यान आता या शेअर मार्केटच्या नादाने एका तरुणाला चोर बनवले असल्याचे समोर आले आहे.

अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील एका गावात एका सुशिक्षित तरुणाला शेअर मार्केटसाठी चक्क चोरी करावी लागली. सध्या ग्रामीण भागात अशिक्षित अल्पशिक्षित तरुणांना शेअर मार्केटमधून झटपट पैसा मिळतो यासाठी गावोगाव एजंट तयार झाले.

तरूण ही त्या मोहात पडले आणि फसले अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील अंभोळ गावातील एका सधन कुटुंबातील उच्चशिक्षित तरुण एक वर्षापूर्वी शेअर मार्केटच्या जाळ्यात आला. काही वेळा पैसे मिळाले मात्र नंतर तो बुडाला

. गावात नातेवाईक आणि मित्रमंडळींकडे उधारी केली ती फिटेना घराजवळ असलेल्या एकाच्या घरी मित्रासोबत येणं जाणं होतं दरम्यान पाच एप्रिल रोजी घरातील साडेपाच तोळे सोन्याचे दागिने एका पिशवीत बांधून अडगळीत ठेवले होते. दि. २० एप्रिल रोजी लग्नाला जायचे म्हणून शोध घेतला असता ते चोरी गेल्याचे लक्षात आले. तातडीने अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दिली.

काही लोकांवर संशय होता मात्र त्या यादीत हा तरुण नव्हता. जवळपास चार लाखांची चोरी असल्याने पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी शोध कामी पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल घोडे, ठाणे अंमलदार अनिल जाधव, हवालदारमहेंद्र गुंजाळ यांचे पथक नेमले.

हेड कॉन्स्टेबल अनिल जाधव आणि महेंद्र गुंजाळ यांनी महिनाभर गावात हालचालींवर लक्ष ठेवले या काळात या तरुणाने अनेक उधारी दिल्या होत्या. त्याचा मोबाइल तपासला असता तो शेअर मार्केटच्या आहारी गेला होता.

सदर सोने त्याने एका ओळखीच्या सोनाराला विकले होते. गुन्ह्याची कबुली देताच पोलिसांनी पावणे चार लाखांचे सोने दागिने हस्तगत केले व आरोपीस ताब्यात घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe