Ahmednagar news : पाऊस पडावा, यासाठी लोक काय करीत नाहीत? कुठे पूजाअर्चा होते, तर कुठे यज्ञ केले जातात. होम हवन, देवदेवताना नवस बोलणे असे अनेक प्रकार केले जात असताना नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात चक्क पाऊस पाडवा म्हणून बेडकांचे लग्न लावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशमध्ये ऊस पडावा, यासाठी बेडूक आणि बेडकीचे लग्न लावण्यात आले होते. त्यानंतर मध्यप्रदेशात एवढा पाऊस झाला की, पुरस्थिती निर्माण झाली. आता या पावसाला थांबवण्यासाठी चक्क या बेडूक आणि बेडकीच्या घटस्फोट करण्यात आला आहे. भोपाळमध्ये ज्यांनी बेडूक-बेडकीचे लग्न लावले होते, त्यांनीच आता त्यांचा घटस्फोट केला आहे.

बेडकांचे लग्न लावण्याची आसाममध्ये खूप जुनी पारंपरिक प्रथा आहे. बेडूक आणि पाऊस यांचा संबंध स्पष्ट करणारी एक कविता पूर्वजांकडून अवतीर्ण झाली. शेतकरी ढगांना पाऊस का पडत नाही, हे विचारतात आणि ढग उत्तर देतात की बेडूकांच्या आरडाओरडा शिवाय पाऊस पडणार नाही. याचे कारण म्हणजे पावसाळा हा बेडकांच्या मिलन कालावधीशी जुळतो आणि म्हणूनच, त्यांच्या क्रोकिंगमुळे पाऊस येतो, असे मानले जाते.
आसाममध्ये असलेली ही प्रथा आता महाराष्ट्रात व नगर जिल्ह्यात रुजत असल्याचे समोर आले आहे. परिसरात पाऊस पडावा यासाठी संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील श्रीस्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र येथे ग्राम आभियाना अंतर्गत सुनील ताजणे यांच्या वस्तीवर बेडकांचे लग्न लावण्यात आले.
इंद्रदेव यांना प्रसन्न करण्यासाठी पर्जन्य यज्ञ व श्रीस्वामी समर्थ महाराज यांनाही पावसासाठी सकडे घालण्यात आले. वैदिक शास्त्रानुसार ग्रहांचे नक्षत्र परिवर्तनसुद्धा एका ठरावीक काळात होत असते. त्यानुसार सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाचा कालावधी सुद्धा निश्चित आहे. सूर्य १५ दिवसांनी एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करतो.
पंधरा दिवसांपूर्वी सूर्या मृगशिरा नक्षत्र प्रवेश केला होता. आता १५ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सूर्य मृगशिरा नक्षत्रातून निघून आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करत आहे. पावसाच्या नक्षत्रांपैकी एक आर्द्रा नक्षत्र होय. २२ जून २०२४ रोजी सूर्य आर्द्रा नक्षत्रात विराजमान झाले असून येत्या ६ जुलैपर्यंत सूर्य आर्द्रा नक्षत्रातच राहील.
या १५ दिवसांत मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती प्रा. अप्पासाहेब शेळके यांनी दिली. अगदी मानवी विवाहाप्रमाणे बेडकांचा विवाह झाला. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.