दिंडी प्रमुख असणाऱ्या प्रसिद्ध महाराजांचे नगरमध्ये पालखी सोहळ्यातच हृदयविकाराने निधन, अहमदनगरसह नाशिकमध्ये शोककळा

ध्या वारकऱ्यांचा दिंडी सोहळा हा विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला आहे. यादरम्यान महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध दिंड्या सध्या मार्गस्थ झालेल्या आहेत. आता याच पार्श्वभूमीवर एक बातमी अहमदनगरमधून आली आहे. दिंडी प्रमुख असणाऱ्या प्रसिद्ध महाराजांचे वारीमध्येच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
shilapurkar

Ahmednagar News : सध्या वारकऱ्यांचा दिंडी सोहळा हा विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला आहे. यादरम्यान महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध दिंड्या सध्या मार्गस्थ झालेल्या आहेत. आता याच पार्श्वभूमीवर एक बातमी अहमदनगरमधून आली आहे.

दिंडी प्रमुख असणाऱ्या प्रसिद्ध महाराजांचे वारीमध्येच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुख ह.भ.प रामनाथ महाराज शिलापूरकर असे या महाराजांचे नाव आहे.

बुधवारी पहाटे नगर येथे ही घटना घडली. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यासह नाशिकमध्येही शोककळा पसरली आहे. पालखी सोहळ्यातच विठू नामच्या गजरातच त्यांचा मृत्यू झाला. हभप रामनाथ महाराज शिलापूरकर हे नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ कीर्तनकार आहेत.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अहमदनगरसह नाशिकमधूनही शोक व्यक्त होऊ लागला. मंत्री छगन भुजबळ यांनी देखील शिलापूरकर महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली.

कोण आहेत रामनाथ महाराज शिरापूरकर ?
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात 27 नंबरच्या पालखीचे ते दिंडी प्रमुख असून सातत्याने 20 वर्षांपासून वारकरी पायी सोहळ्याचे नियोजन करत आले आहेत. ते नाशिक जिल्ह्यातील शिरपूर येथील राहणारे आहेत.

नाशिक जिल्ह्यात नामसंकीर्तन सप्ताह सुरू करून जवळपास हजारो गाव खेड्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांपासून सप्ताह सुरू असायचे. त्यांचे धार्मिक कार्य मोठे असल्याने त्यांच्या निधनाची बातमी सजमताच वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर कोसळला. आज पहाटे नगर येथे पालखी सोहळ्याच्या प्रसंगी त्याकनही प्राणज्योत मालवली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe