३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी केली तरी जुलैचेही मिळणार पैसे ! ‘लाडकी बहीण’ बाबत पुन्हा आले नवीन अपडेट, वाचा सविस्तर..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रक्रियेला सरकारकडून गती देण्यात येत आहे. यासंदर्भात अध्यादेशही जारी करण्यात आला आहे. त्यानुसार ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांनाही १ जुलै २०२४ पासून आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
cm

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रक्रियेला सरकारकडून गती देण्यात येत आहे. यासंदर्भात अध्यादेशही जारी करण्यात आला आहे. त्यानुसार ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांनाही १ जुलै २०२४ पासून आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत १५ जुलै २०२४ पर्यंत होती. त्याला आता मुदतवाढ देण्यात आली असून ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. दि. ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि. १ जुलै, २०२४ पासून दरमहा रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येईल.

दरम्यान, ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता
या योजने अंतर्गत मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द झाल्यानंतर, एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रती पात्र लाभार्थी ५० रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.

एका कुटुंबातील दोन महिलांनाच लाभ
दरम्यान आणखी एक बदल म्हणजे एका कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. या निर्णयानुसार एक विवाहित व एक अविवाहित महिला भगिनींना या योजनेतून आर्थिक लाभ मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe