Ordnance Factory Dehu Road : पुण्यातील देहू रोड वरील ‘या’ कारखान्यात पदवीधर उमेदवारांना मिळणार नोकरी, तब्बल 201 जागांवर भरती!

Ahilyanagarlive24 office
Published:

Ordnance Factory Dehu Road Bharti : आयुध निर्माणी कारखाना देहू रोड अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत, जाणून घेऊया…

वरील भरती अंतर्गत पदवीधर शिकाऊ आणि तंत्रज्ञ शिकाऊ पदाची 201 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन आणि ई-मेल अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत. येथे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ५ जुलै आहे. तरी उमेदवारांनी आजच्या आज आपले अर्ज सादर करावे.

शैक्षणिक पात्रता

ज्या उमेदवारांनी एओसीपी ट्रेडमधील एनएसी/एनटीसी प्रमाणपत्र असलेले एओसीपी ट्रेडचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तसेच एओसीपी ट्रेडद्वारे जारी केलेले, जे पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या अंतर्गत आयुध निर्माणीमध्ये प्रशिक्षित आहेत.

नोकरी ठिकाण

ही भरती देहू रोड, जिल्हा – पुणे येथे होत आहे.

अर्ज पद्धती

येथे अर्ज ऑफलाईन आणि ई-मेल अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जुलै आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता

ऑनलाईन अर्ज [email protected] या ईमेलवर सादर करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

ऑफलाईन अर्ज मुख्य महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी देहू रोड, पुणे- ४१२१०१ या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास ddpdoo.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा

-सदर पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.

-अर्ज वर दिलेल्या पद्धतीनुसार सादर करायचे आहेत.

-अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे देखील आवश्यक आहे.

-अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

-भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास भरती जाहिरात सविस्तर वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe