OnePlus : वनप्लसचा शक्तिशाली स्मार्टफोन Nord 4 लवकरच होणार लॉन्च, किंमत खूपच कमी…

OnePlus

OnePlus : वनप्लस Nord सीरीजचा Nord 3 गेल्या वर्षी लॉन्च झाला होता. आता लवकरच OnePlus त्याच्या Nord मालिकेत आपला पुढचा फोन Nord 4 लॉन्च करणार आहे. मात्र, कपंनीने याच्या लॉन्च डेटची अधिकृत घोषणा केलेली नाही, मिळालेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन भारतात 16 जुलै रोजी लॉन्च केला जाऊ शकतो. OnePlus Nord 4 च्या सर्व वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया.

आत्तापर्यंत, वनप्लसने लॉन्चची तारीख अधिकृतपणे घोषित केलेली नाही. पण सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीनुसार हा फोन भारतात 16 जुलै रोजी लॉन्च होणार आहे. त्याची किंमत सुमारे 31,999 असू शकते. अशी अपेक्षा आहे, तसेच कपंनी या फोनसोबत OnePlus Buds 3 Pro आणि OnePlus Watch 2R लाँच करेल.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोनुसार, OnePlus Nord 4 मध्ये ड्युअल-टोन डिझाइन आणि ड्युअल रियर कॅमेरे असतील. हा कॅमेरा सेटअप मागील वर्षी आलेल्या Nord 3 पेक्षा खूप वेगळा आहे, Nord 3 ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येण्याची शक्यता आहे.

OnePlus Nord 4 मध्ये 6.74-इंचाचा OLED डिस्प्ले असेल, जो 1.5K रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 2,150 nits पीक ब्राइटनेससह येईल. प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये Snapdragon 7 Gen 3 चिपसेट दिला जाऊ शकतो. स्टोरेजसाठी, तुम्हाला 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळू शकते.

OnePlus Nord 4 मध्ये 50-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड सेन्सर असू शकतो. सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि ड्युअल स्पीकरसह येऊ शकतो. कनेक्टिव्हिटीसाठी, यात 5G, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.4, NFC आणि IR ब्लास्टर दिले जाऊ शकतात.

कंपनी यामध्ये 5,500mAh बॅटरी देईल, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल अशी अपेक्षा आहे. OnePlus Nord 4 हा एक शक्तिशाली मिड-रेंज फोन असल्याचे सिद्ध होऊ शकते.

OnePlus Nord 4 ही OnePlus Ace 3V ची पुनर्ब्रँडेड आवृत्ती असू शकते, जी मार्चमध्ये चीनमध्ये लॉन्च झाली होती. अशी अपेक्षा आहे की येत्या काही दिवसात कंपनी अधिकृतपणे लॉन्चची घोषणा करेल,

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe