अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण अद्यापही कायम आहे. जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.
या महामारीमध्ये रुग्णाला उपचारादरम्यान खासकरून ऑक्सिजनची आवश्यकता भासत असते. मात्र याच ऑक्सिजनचा सध्या शहरात काळाबाजार होत असल्याच्या प्रकार घडू लागला आहे.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ऑक्सिजनची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा करताना व्यापाऱ्यांकडून जादा किंमत आकारण्यात येऊ लागली आहे.
त्यामुळे याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नगर शाखेने थेट जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे तक्रार केली आहे.
सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करताना लुटालूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे.
नगर जिल्ह्यामध्ये कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे. याकाळात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये, यासाठी प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहे.
मात्र, त्यातच ऑक्सिजन पुरवठा करणारे व्यापारी खासगी रुग्णालयांकडून जादा दर आकारून त्यांची लूट करीत असल्याची तक्रार इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी केली आहे.
संघटनेने तसे निवेदनच जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. सरकारी आदेशाप्रमाणे ऑक्सिजनची किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र व्यापारी जादा दर आकारत आहे.
महामारीच्या काळात अशी लुटालूट करणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे वैद्यकीय क्षेत्र बदनाम होत आहे, अशांवर कारवाई झाली पाहिजे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved