दिंडीत मुस्लिमांच्या खांद्यावर भगवी पताका, अहमदनगरमधील ‘त्या’ पालखीत घडले ‘असे’ काही

अहमदनगर जिल्हा हा पुरोगामी विचारांचा. अहमदनगर जिल्ह्यास धार्मिक, सांस्कृतिक वारसा फार मोठा. आता अहमदनगर जिल्ह्यातून सामाजिक ऎक्याबाबत अभिमानास्पद बातमी आली आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
palakhi

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा हा पुरोगामी विचारांचा. अहमदनगर जिल्ह्यास धार्मिक, सांस्कृतिक वारसा फार मोठा. आता अहमदनगर जिल्ह्यातून सामाजिक ऎक्याबाबत अभिमानास्पद बातमी आली आहे.

दिंडी प्रस्थान सोहळ्यात मुस्लीम बांधवांच्या खांद्यावर भगवी पताका पाहायला मिळाली. विशेष म्हणजे मुस्लीम समाजाकडून अल्पोपहाराची सोय देखिल करण्यात आली होती.

पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील दिंडी प्रस्थान सोहळ्यात हे ऐक्य पाहायला मिळाले. कोणताही आविर्भाव न आणता अगदी सहजपणे वारीत घडलेले हिंदू-मुस्लीम एकेतेचे दर्शन दिंडीत मात्र कौतुकाचा विषय झाले.

प्रस्थान सोहळ्यात सहभागी होऊन वारकऱ्यांना निरोप देण्याची मुस्लीम समाजाची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. कान्हूर पठार येथील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडविणारा हा फोटो सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.

कान्हूर पठार येथील दिंडीने संत निळोबाराय महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पिंपळनेरकडे प्रस्थान केले. या प्रस्थान सोहळ्यात मुस्लीम बांधवांनी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेतली.

मंदिर व मशीदची भिंत समाईक
कान्हूर पठार येथे विठ्ठल- रुक्मिणी मंदिर व मशीद असिन हे दोन्ही शेजारी शेजारी आहेत. विशेष म्हणजे मंदिर व मशीदची एक भिंत समाईक असून दिंडीचे प्रस्थान ज्या पटांगणातून होते,

त्याच पटांगणातून मोहरमच्या ताबूतांची मिरवणूक निघते. अनेक वर्षांची ही परंपरा आहे. हे सर्व अभिमानास्पद आहे.

अहमदनगर जिल्ह्यात नेहमीच दिसते एकी
अहमदनगर जिल्ह्यात सामाजिक ऐक्य नेहमीच दिसते. किरकोळ अपवाद वगळता जिल्ह्यात कुठेही सामाजिक ऐक्य बिघडेल अशा घटना दिसत नाही. दरम्यान या पालखीचा जो फोटो व्हायरल होत आहे

यातून हे सामाजिक ऐक्य प्रकर्षाने जाणवते व अहमदनगरचा व या सामाजिक ऐक्याचा अभिमान वाटतो असे सध्या नागरिक म्हणत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe