कृषिपंपांसाठी आता मिळणार मोफत वीज ! पण थकबाकीचे काय? वसूल होणार की माफ? पहा..

शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार असल्याची घोषणा देखील अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना केली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु असे असले तरी थकबाकी बाबत शेतकऱ्यांमध्ये सध्या संभ्रम आहे. थकबाकी भरायची की सरकारने ती माफ केली? याबाबत अद्याप स्पष्टता नाही

Ahmednagarlive24 office
Published:
ajit pawar

Ahmednagar News : लोकसभा निवडणुका झाल्या व या निवडणुकांमधे शेतकऱ्यांच्या प्रश्नाने महायुतीला फटका बसला. आता मात्र सरकार शेतकऱ्यांच्या दृष्टीने पावले उचलत आहे. शेतकऱ्यांसाठी विविध योजना व विविध घोषणा शासनाने केल्या आहेत.

यातच शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार असल्याची घोषणा देखील अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना केली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु असे असले तरी थकबाकी बाबत शेतकऱ्यांमध्ये सध्या संभ्रम आहे.

थकबाकी भरायची की सरकारने ती माफ केली? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. नगर जिल्ह्यातील सुमारे चार लाख शेतकऱ्यांकडे साडेसात हजार कोटींची थकबाकी आहे. मात्र आजच्या स्थितीत अनेक शेतकऱ्यांकडे कृषिपंपांची लाखोंची थकबाकी आहे.

ही थकबाकी भरण्याबाबत महावितरणतर्फे वेळोवेळी कारवाई मोहिमा राबविण्यात आल्या. तरीदेखील कृषिपंपांची १०० टक्के वसुली महावितरणतर्फे करण्यात आलेली नाही. सरकारने आता मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. मात्र, थकबाकीच्या वीजबिलांवरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

थकबाकी वसूलबाबत संभ्रम
शेतकऱ्यांकडून थकबाकी वसूल केली जाणार की ति ही माफ केली जाणार याबाबतही संभ्रम आहे. शासनाकडून अद्याप यावर आदेश आला नसल्याचे महावितरण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मागेल त्याला सौर ऊर्जा पंप
शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्यांचे विलगीकरण आणि सौर ऊर्जा तयार करण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी, यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप देण्यात येणार आहेत.

या योजनेसाठी ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचेही सांगण्यात आले. सरकारच्या निर्णयाचे शेतकऱ्यांमधून स्वागत करण्यात येत आहे.

.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe