मुलांच्या भांडणातून दोन समाजाच्या गटात हाणामारी, अहमदनगरमधील घटना

मुलांमधील मारहाणीच्या घटनेवरून बोल्हेगाव उपनगरातील गांधीनगरमध्ये दोन समाजाच्या गटांत वाद झाला. या प्रकरणी दोन्ही गटांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून परस्पर विरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल केले आहेत.

Ahmednagarlive24 office
Published:
hanamari

Ahmednagar News : मुलांमधील मारहाणीच्या घटनेवरून बोल्हेगाव उपनगरातील गांधीनगरमध्ये दोन समाजाच्या गटांत वाद झाला. या प्रकरणी दोन्ही गटांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून परस्पर विरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल केले आहेत.

यास्मिन अकिल शहा (वय ३१ रा. गांधीनगर, बोल्हेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आश्विनी दिनेश बुरकुले (रा. गांधीनगर, बोल्हेगाव) हिच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहा यांचा मुलगा क्लासला जात असताना बुरकुले हिच्या मुलाने विनाकारण शहा यांच्या मुलाला मारहाण केली.

या प्रकाराबाबत शहा या बुरकुले यांना विचारण्यासाठी गेल्या असता त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. महिला उपनिरीक्षक शुभांगी मोरे अधिक तपास करत आहेत. दुसऱ्या गटाच्या आश्विनी दिनेश बुरकुले यांनी दिलेल्या तक्रारीवरून यास्मिन अकिल शहा हिच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुरकुले व शहा एकमेकांच्या ओळखीचे आहे. बुरकुले यांचा मुलगा क्लासला जात असताना शहा हिच्या मुलाने त्याला मारहाण केली. याबाबत बुरकुले यांनी शहाकडे विचारपूस केली असता त्यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

अधिक तपास सहायक निरीक्षक जे. सी. मुजावर करत आहेत. अहमदनगर शहरात विविध गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मारहाणीच्या घटना या नित्याच्याच झाल्यात का? असा प्रश्न सध्या नागरिकांना पडला आहे.

मागील काही दिवसांत घडलेल्या टोळीयुद्धाच्या घटनांनी देखील वातावरण ढवळून निघाले. अगदी किरकोळ कारणावरून देखील अशा मारहाणीच्या घटना घडताना दिसून येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी यावर लवकरच मोठी ऍक्शन घ्यावी असे नागरिक म्हणत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe