जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा DA 4% नाही तर ‘इतका’ वाढणार ! महागाई भत्ता 0 होणार का ? वित्त मंत्रालयाने स्पष्टचं सांगितलं

Tejas B Shelar
Published:
7th Pay Commission

7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा महागाई भत्ता वाढी संदर्भात आहे. खरे तर दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता म्हणजे DA दर सुधारित केला जात असतो.

जानेवारी 2024 पासून डीए सुधारित झाला आहे. मार्च महिन्यात याबाबतचा निर्णय घेतला गेला होता. या निर्णयानुसार केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्यापासून चा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला आहे.

आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% एवढा होता. मात्र जानेवारी महिन्यापासून यात चार टक्क्यांची वाढ झाली आहे. आता जुलै महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार हा मोठा सवाल आहे? महागाई भत्ता हा एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरत असतो.

जुलै महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार हे जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरणार आहे. सध्या स्थितीला जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांची आकडेवारी समोर आली आहे.

मे महिन्याची आकडेवारी जून अखेरपर्यंत येणे अपेक्षित होते. मात्र ही आकडेवारी अजून समोर आलेली नाही. दुसरीकडे जून महिन्याची आकडेवारी जुलै महिन्याच्या अखेरीस येणार आहे.

यावरून यावेळी में आणि जून या दोन्ही महिन्यांची आकडेवारी जुलैच्या अखेरीस जारी होऊ शकते असे म्हटले जात आहे. अर्थातच जुलैच्या अखेरीस यावेळी महागाई भत्ता किती वाढणार हे स्पष्ट होणार आहे. गेल्यावेळी म्हणजे जानेवारी महिन्यापासून चार टक्के महागाई भत्ता वाढ देण्यात आली होती.

परिणामी जुलै महिन्यापासून सुद्धा एवढीच वाढ लागू झाली पाहिजे अशी कर्मचाऱ्यांची इच्छा आहे. परंतु एप्रिल पर्यंतच्या आकडेवारीवर जर नजर टाकली तर यावेळी चार टक्के महागाई भत्ता वाढ मिळणार नाही असे दिसत आहे.

यावेळी म्हणजे जुलै 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढू शकते असे जाणकार लोकांचे म्हणणे आहे. म्हणजे महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्क्यांवर पोहोचणार आहे.

महागाई भत्ता शून्य होणार का ?

गेल्या अनेक महिन्यांपासून मीडिया रिपोर्ट्स मध्ये महागाई भत्ता 50 टक्क्यांवर पोहोचल्यानंतर तो शून्य केला जाईल आणि महागाई भत्त्याची रक्कम मूळ वेतनात जोडली जाईल असा दावा केला जात होता. मात्र, डीए मूळ वेतनात विलीन करण्याची कोणतीही योजना नसल्याचे केंद्रीय वित्त मंत्रालयाने नुकतेच स्पष्ट केले आहे.

तसेच कर्मचाऱ्यांना अधिकृत माहितीची प्रतीक्षा करण्याचा आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला देखील यावेळी देण्यात आला आहे. एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून महागाई भत्ता शून्य होणार अशा ज्या चर्चा होत्या त्या चर्चांना आता पूर्णविराम लागणार अशी आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe