Latest Discount Offer : सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये एसयूव्ही वाहनांची मागणी वाढत आहे. भारतातील एकूण कार विक्रीमध्ये SUV सेगमेंटचा वाटा 50 टक्क्यांहून अधिक आहे. अशातच जर तुम्हीही येत्या काही दिवसांत नवीन SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
सध्या मारुती सुझुकी आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या होणाऱ्या SUV Maruti Suzuki Fronx वर बंपर सूट देत आहे. जुलै महिन्यात मारुती सुझुकी Fronx खरेदीवर ग्राहक जास्तीत जास्त 75,000 रुपयांची बचत करू शकतात. Maruti Suzuki Fronx ही प्रवासी वाहन विभागातील पहिली कार आहे जी 10 महिन्यांत SUV च्या 1 लाख युनिट्सची विक्री करते. Maruti Suzuki Fronx ची विक्री, सवलत, ऑफर, पॉवरट्रेन आणि किंमतीबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
कंपनीने एप्रिल 2023 मध्ये Maruti Suzuki Fronx लाँच केले होते, ज्याने आर्थिक वर्ष 2024 मध्ये SUV च्या एकूण 1,34,735 युनिट्सची विक्री केली होती. कंपनी जुलै महिन्यात मारुती सुझुकी स्विफ्टच्या टर्बो पेट्रोल व्हेरियंटवर 35,000 रोख सवलत, 30,000 किमतीच्या Velocity Edition Accessories आणि
10,000 चे एक्सचेंज बोनससह 75,000 रुपयांची सूट देत आहे.
याशिवाय, कंपनी Maruti Suzuki Fronx मॅन्युअल ट्रान्समिशन वेरिएंटवर 32,500 रुपये आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंटवर 37,500 रुपयांची सूट देत आहे. दुसरीकडे, कंपनी मारुती Maruti Suzuki Fronxच्या CNG व्हेरिएंटवर 10,000 रुपयांची सूट देत आहे. या वाहनाच्या सवलतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ग्राहक त्यांच्या जवळच्या डीलरशी संपर्क साधू शकतात.
पॉवरट्रेन
जर आपण पॉवर ट्रेनबद्दल बोललो तर, Maruti Suzuki Fronx मध्ये 1.0-लीटर टर्बो बूस्टरजेट पेट्रोल इंजिन आहे जे 100bhp ची कमाल पॉवर आणि 147Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तर दुसरे 1.2-लिटर पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे जे 90bhp ची कमाल पॉवर आणि 113Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. Maruti Suzuki Fronxची भारतीय बाजारपेठेत टाटा नेक्सन, मारुती सुझुकी ब्रेझा, महिंद्रा XUV 3X0, Hyundai Venue, Kia Sonet आणि Nissan Magnite सारख्या SUV सोबत स्पर्धा आहे. भारतीय बाजारात Maruti Suzuki Fronx ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.51 लाख ते 13.04 लाख रुपयांपर्यंत आहे.