Ahmednagar News : जगदंबा विद्यालयात पालक शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली. मंडलिक शरद यांनी पालक शिक्षक संघाचे महत्व आपल्या प्रास्तविकात सांगितले.
अशोक हराळ यांनी शाळेमध्ये वर्षभर राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रम व शालेय यशाबद्दल पालकांना माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक दरेकर जयसिंग यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा व भविष्यातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांच्या सहभागाची अपेक्षा व्यक्त केली.
इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आभार नेहुल आबासाहेब यांनी मानले. पालकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.