Samsung Galaxy : सॅमसंग प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. सॅमसंग कंपनी लवकरच नवीन मिड-रेंज बजेट फोन लॉन्च करणार आहे. कंपनीने Samsung Galaxy M35 5G च्या लॉन्च तारखेची पुष्टी केली आहे. याबाबतची माहिती Amazon वर एक पोस्टर शेअर करून देण्यात आली आहे. कंपनीचा हा फोन दमदार फीचर्ससह आकर्षक किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो.
कपंनीने लॉन्च पूर्वीच या फोनबद्दल माहिती दिली आहे. हा फोन शक्तिशाली 6000mAh बॅटरी, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि AMOLED डिस्प्लेसह येईल. चला जाणून घेऊया या फोनची खास वैशिष्ट्ये जाणून घेऊया…
कंपनी 17 जुलै रोजी Samsung Galaxy M35 5G लाँच करेल. हा फोन ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. त्याची मायक्रो साइट देखील ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर थेट झाली आहे. हा कंपनीच्या एम-सिरीजचा भाग असेल. हा फोन तीन रंगात येईल. हा फोन Amazon प्राइम डे सेलचा भाग असेल. ब्रँडने आधीच याबाबत सांगितले आहे.
वैशिष्ट्ये
Samsung Galaxy M35 5G मध्ये 6.6-इंचाचा FHD सुपर AMOLED इन्फिनिटी O डिस्प्ले मिळू शकतो. स्क्रीन 120Hz रिफ्रेश दर आणि 1000 Nits च्या पीक ब्राइटनेससह येईल. यात Exynos 1380 प्रोसेसर असेल. फोन 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज पर्यायात येऊ शकतो.
मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने या फोनचे स्टोरेज देखील वाढवता येते. हा फोन Android 14 वर आधारित One UI 6.1 वर काम करेल. यात 50MP प्राथमिक लेन्स, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्सचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. .
समोर, कंपनी 13MP सेल्फी कॅमेरा देऊ शकते. सुरक्षेसाठी कंपनी या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देईल. डिव्हाइस 6000mAh बॅटरीसह येईल, जे 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. यामध्ये टाइप-सी चार्जिंग पोर्ट उपलब्ध असेल.