साई संस्थानच्या सकारात्मतेमुळे २६७ कोटी रुपये खर्चुन निमगाव हद्दीत उभारलेले भव्य शैक्षणिक संकुल सुरू !

Ahmednagarlive24 office
Published:
sai sansthan

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने सकारात्मक पाऊल उचलून सुमारे २६७ कोटी रुपये खर्चुन निमगाव हद्दीत उभारलेले भव्य शैक्षणिक संकुल सुरू करून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर केली आहे.

त्याबद्दल शिर्डी ग्रामस्थ, निमगाव कोऱ्हाळे ग्रामपंचायत तसेच निमगाव येथील जनसेवा युवक मंडळाच्या वतीने सरपंच कैलास कातोरे व कार्यकत्यांनी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवले यांचा नुकताच सन्मान करण्यात आला.

श्री साईबाबा संस्थान प्रशासनाने निमगाव हद्दीत अद्यावत शैक्षणिक संकुल उभारले आहे. इमारत पूर्णत्वास असूनही गेल्या दोन वर्षापासून हे शैक्षणिक संकुल बंद होते. त्यामुळे साईबाबा संस्थानच्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता नूतन शैक्षणिक संकुल तातडीने सुरू करावे, अशी मागणी शिर्डी ग्रामस्थ व निमगाव येथील जनसेवा मंडळाच्या कार्यकत्यांनी संस्थान प्रशासनाकडे केली होती.

सरपंच कातोरे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची समक्ष भेट घेऊन शैक्षणिक संकुल बंद असल्याने विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय व इतर समस्या निदर्शनास आणून देत हे शैक्षणिक संकुल तातडीने सुरू करण्यासाठी विनंती केली होती.

तसेच युवा ग्रामस्थ नितीन उत्तमराव कोते व त्यांचे सहकारी, शिर्डीतील पदाधिकारी यांच्या समवेत जाऊन सरपंच कातोरे यांनी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांना शैक्षणिक संकुल सुरू करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. हा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलनाचा देखील इशारा दिला होता.

परंतु या प्रश्नावर साईबाबा संस्थान प्रशासनाने सहानुभूतीने व सकारात्मक दृष्ट्या पाऊल उचलून विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने शैक्षणिक संकुल तातडीने सुरू केले. त्यामुळे शिर्डी, निमगाव, सावळीविहीर, निघोज यासह पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर झाली आहे.

निमगाव कोन्हाळेचे सरपंच कातोरे तसेच शिर्डीतील युवानेते नितीन उत्तमराव कोते, निलेश कोते, दीपक वारुळे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश कातोरे, शिवाजी ठाकरे, मधुकर वाल्लेकर, सोपान भडांगे, मनोज कुलाळ व अशोक पवार, सुधीर शिंदे, विकास गोदकर, सुनील गोंदकर, दत्तात्रय कोते, किरण कोते, पंडित कोते, मयूर कोते, प्रसाद सुरंजे, सोमराज कावळे, जयेश बोबडे, पप्पू शेजवळ, वसंत शिंदे आदी प्रमुख मान्यवरांनी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर व उपकार्यकारी अधिकारी हुलवले यांचा सत्कार केला व या शैक्षणिक संकुलाला विद्यार्थ्यांसाठी खुले करून दिल्याबद्दल संस्थान प्रशासनाचे आभार मानले.

निमगाव कोऱ्हाळे विकासाचे रोल मॉडेल

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विकासात्मक दूरदृष्टीतून निमगाव को-हाळे गाव विकासाचे रोल मॉडेल बनत आहे. गावात साईबाबा संस्थान प्रशासनाचे सुमारे २६८ कोटी रुपयांचे भव्य शैक्षणिक संकुल उभे राहिले. त्याचबरोबर शासनाची कोट्यावधी रुपयांची जमीन गावाला गावठाण म्हणून दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासह इतरही शासकीय कार्यालय निमगाव हद्दीत उभे राहिले. त्यामुळे गावचा सर्वांगिण विकास होत आहे. त्याचबरोबर गाव विकासाचे रोल मॉडेल म्हणून उदयास येत आहे. हे सर्व विखे पाटील परिवारामुळे होत आहे.

त्यामुळे लवकरच निमगाव ग्रामस्थ व पंचक्रोशीच्या वतीने शैक्षणिक संकुल सुरू केले व गावात विविध विकासाचे प्रकल्प आणून गावठाणाला जागा मिळवून दिल्याबद्दल ना. विखे पाटील व माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचा नागरी सत्कार करणार असल्याचे निमगाव कोऱ्हाळेचे प्रथम लोकनियुक्त सरपंच कैलास कातोरे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe