श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी रविवार बंदची हाक, प्रांताधिकारी कार्यालयासमोर कृती समितीचे निदर्शन !

Ahmednagarlive24 office
Published:
shrirampoor jilha

श्रीरामपूर जिल्हा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीकडून श्रीरामपूर प्रांताधिकारी कार्यालयासमोर काल सोमवारी (दि.८) निदर्शने करण्यात आले. यावेळी रविवारी (दि.१४) स्वयंस्फूर्तीने श्रीरामपूर बंदची हाक देण्यात आली आहे.

यावेळी माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक म्हणाल्या, श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी स्व. गोविंदराव आदिक यांनी मूलभूत सुविधा उपलब्ध करून ठेवल्या आहे. श्रीरामपूर जिल्हा व्हावा, ही प्रत्येक श्रीरामपूरकरांचे स्वप्न आहे.

ते स्वप्न साकार करण्यासाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीने श्रीरामपूर जिल्ह्यासाठी जेव्हा जेव्हा आंदोलन होतील. त्यामध्ये आपण पुर्ण ताकदीने उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच कृती समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन म्हणाले की, श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी गेली ४० वर्षापासून श्रीरामपूरकरांची मागणी आहे. परंतु राजकीय आकसापोटी श्रीरामपूर जिल्हा होण्यास अडथळा निर्माण केला जात आहे.

म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी (दि. १४) स्वयंस्फूर्तीने श्रीरामपूर बंद मध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे म्हणाले की, श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी सर्व गट-तट विसरून श्रीरामपूरकर म्हणून एकजूट आपल्याला दाखवावी लागेल.

कामगारनेते नागेश सावंत म्हणाले, श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी आपल्याला तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडावे लागेल. कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की, सत्तेमध्ये असलेल्या कार्यकत्यांनी आपली ताकद वापरून श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी सरकारला भाग पाडावे.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक म्हणाले, श्रीरामपूर जिल्ह्यासाठी आमदार लहू कानडे यांना सांगून विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यास सांगणार आहे. तर शिवसेनेचे सचिन बडदे म्हणाले,

आपल्याला आंदोलनाबरोबर सरकारी दप्तरी देखील कागदपत्रे देऊन भांडावे लागेल. तसेच प्रशांत लोखंडे म्हणाले की, श्रीरामपूर जिल्ह्याच्या प्रश्नासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ घेऊन जिल्हा कृती समितीच्या शिष्टमंडळाची चर्चा घडवून आणेल.

श्रीरामपूर मर्चेंट असोसिएशनचे संजय कासलीवाल म्हणाले की, आपण जर श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी एकजूट दाखवली नाही, तर श्रीरामपूरचे नुकसान होण्यास वेळ लागणार नाही.

याप्रसंगी आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल, श्रीरामपूर मर्चेंट असोसिएशन अध्यक्ष मुकेश कोठारी, राहुल मुथा, प्रवीण गुलाटी, अशोक उपाध्ये, उमेश पवार, गौतम उपाध्ये, संतोष बत्रा, योगेश ओझा, अभिजीत लिप्टे, बाळासाहेब चांडोळे, शरद शेरकर, निलेश बोरावके, रियाज पठाण, सतीश कुदळे, डॉ. संजय नवथर, अमोल सावणे, नितीन कापसे, अनिल तलोज, अॅड. संदीप चोरगे, आदित्य आदिक, अविनाश पोहेकर, अनिरूद्ध भिंगारवाला, शुभम लोळगे, आबासाहेब औताडे, प्रवीण फरगडे, मच्छिद्र साळुंखे, वामन लचके, अनिल चांडवले, हरेश भटेजा, संदीप धिवर, नितीन जाधव, अल्ताफ शेख, रमेश अमोलिक व सर्वपक्षीय नेते तसेच व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe