नगर तालुक्यातील रस्त्यांचा कायापालट, राज्यमार्गात होणार रुपांतर – आ. तनपुरे !

Published on -

नगर तालुक्यातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला निंबळक-चास- खंडाळा ते राज्य मार्ग १०, ते वाळुंज- नारायण डोह प्र राज्य मार्ग २, ते राज्य मार्ग १४८, बारदरी- खांडके-कापूरवाडी- पिंपळगाव उज्जैनी-पोखर्डी ते राज्य मार्ग, १४६ हा रस्ता दर्जोन्नत करण्यात येऊन त्यांचे राज्य मार्गात रूपांतर करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

याबाबत आदेशही निर्गमित करण्यात आले असल्याची माहिती आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना आमदार तनपुरे यांनी सांगितले की, नगर तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक एक या ६४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे.

वाहतुकीच्या प्रमाणात रस्त्याची रुंदी आवश्यक असल्याने त्याचबरोबर त्याचा दर्जा सुधारणे आवश्यक होते. त्यासाठी सदर रस्त्यांचे राज्य मार्गात रूपांतरित करणे गरजेचे होते. याबाबत प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता.

वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे शासनाने निंबळक चास-खंडाळा ते राज्य मार्ग १० ते वाळुंज – नारायणडोह राज्य मार्ग २ ते राज्य मार्ग १४६ बारदरी खांडके कापूरवाडी – पिंपळगाव उज्जैनी पोखर्डी ते राज्य मार्ग १४६ या ७४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यास राज्यमार्ग क्र. ४८४ म्हणून दर्जोन्नत करण्यास मान्यता दिलेली आहे.

याबाबतचे शासन आदेशही निर्गमित केलेले आहे. सदर रस्ता राज्यमार्ग म्हणून दर्जोन्नत झाल्यामुळे त्याच्या विकासाकरिता प्राधान्याने निधी उपलब्ध होऊन रस्त्याची रुंदी वाढविण्यासाठी व त्याचा विकास करण्यासाठी मदत होणार आहे.

तालुक्यातील रस्त्यांचा आमदार प्राजक तनपुरे यांच्या प्रयत्नातून कायापालट होणार आहे. त्याबद्दल प्रा. शशिकांत गाडे, गोविंद मोकाटे, रघुनाथ झिने, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे, तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले यांनी तनपुरे यांचे अभिनंदन केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe