माजी खा. कै. दिलीप गांधींच्या कुटुंबियांना अटक होणार? न्यायालयात कुणी काय केला युक्तिवाद? पाच जणांच्या विरोधात नेमकी आहे फिर्याद? वाचा सविस्तर..

आम्ही बँकेत संचालक वा कोणत्याही पदावर नव्हतो, तरीही आमच्याविरोधात केवळ राजकीय आकसापोटी तक्रार केल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे. या सर्वांच्या बँक खात्यात बँकेला विविध वस्तूंचा पुरवठा करणारे ठेकेदार, काही कर्जदारांच्या खात्यातून पैसे जमा झाले आहेत. हे सर्वजण तत्कालीन अध्यक्षांची मुले, पत्नी, सुना आहेत. त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे कशासाठी जमा झाले, त्याची माहिती घेणे आवश्यक आहे. तसेच २९१ कोटींच्या अफरातफरीपैकी ७२ कोटींच्या रोख रकमेचा हिशेब गरजेचा आहे. हे पैसे नेमके घेतले कोणी, याचा तपास बाकी आहे.

Published on -

Ahmednagar News : भाजपचे माजी खासदार व अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष कै. दिलीप गांधी यांच्या कुटुंबातील पाच जणांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

नगर अर्बन कर्ज घोटाळाप्रकरणी तत्कालीन अध्यक्ष दिवंगत दिलीप गांधी यांच्या पत्नी सरोज, सुवेंद्र गांधी, त्यांची पत्नी दीप्ती गांधी, देवेंद्र गांधी, त्यांची पत्नी प्रगती गांधी अशा पाचही जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. सित्रे यांनी फेटाळला आहे.

आम्ही बँकेत संचालक वा कोणत्याही पदावर नव्हतो, तरीही आमच्याविरोधात केवळ राजकीय आकसापोटी तक्रार केल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे. या सर्वांच्या बँक खात्यात बँकेला विविध वस्तूंचा पुरवठा करणारे ठेकेदार, काही कर्जदारांच्या खात्यातून पैसे जमा झाले आहेत.

हे सर्वजण तत्कालीन अध्यक्षांची मुले, पत्नी, सुना आहेत. त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे कशासाठी जमा झाले, त्याची माहिती घेणे आवश्यक आहे. तसेच २९१ कोटींच्या अफरातफरीपैकी ७२ कोटींच्या रोख रकमेचा हिशेब गरजेचा आहे. हे पैसे नेमके घेतले कोणी, याचा तपास बाकी आहे.

आरोपींची सनावे फॉरेन्सिक ऑडिटमधून निष्पन्न झाली असल्याने राजकीय हेतूने तक्रार केल्याच्या दाव्याला अर्थ नाही. त्यामुळे कोणाचेही जामीन मंजूर करू नये, असा युक्तीवाद सरकारी वकील व ठेवीदारांच्या वकीलाने केला होता.

काय आहे तक्रारदाराची फिर्याद ?
तक्रारदार राजेंद्र गांधी यांनी फिर्याद दिल्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्यात एकत्रित गुन्हा दाखल झाला. या फिर्यादीत दिवंगत गांधी यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश नव्हता.

चौकशीत दिवंगत गांधी यांची पत्नी, दोन मुले व सुनांची नावे समोर आली आहेत. बँकेने नियुक्त केलेल्या पुरवठादाराच्या खात्यातून रकमा गांधी यांच्या परिवारातील सदस्यांच्या खात्यात जमा झाल्या आहेत. त्याचा तपास सुरू असून, पोलिस गांधी परिवाराच्या शोधात आहेत.

७२ कोटींचा हिशोब लागेना
नगर अर्बन बँकेत २९१ कोटींचा घोटाळा झाल्याचे फॉरेन्सिक ऑडिटच्या अहवालात उघड झालेले आहे. यापैकी ७२ कोटी रुपये रोख स्वरूपात काढण्यात आले आहेत. ते कोणी कशासाठी काढले? याचा अद्याप हिशोब लागलेला नाही. या पैशांचा हिशोब घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe