Mercedes Benz EQA Electric Car : देशात कार चालविण्याची आवड असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मर्सिडीज कार घेण्याचे स्वप्न असते. पण प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्ण होईलच असे नाही. म्हणूनच कंपनीने दोन नवीन मॉडेल्स सादर केले आहेत. जे अगदी तुमच्या बजेटमध्ये आहेत. विशेष बाब म्हणजे कपंनीने ही दोन वाहने खूपच कमी किमतीत लॉन्च केली आहेत. ही वाहने म्हणजे EQA आणि EQB अशी आहेत.
कंपनीने 2017 मध्ये भारतात प्रथमच EQA चे संकल्पना मॉडेल सादर केले आणि 2021 मध्ये जागतिक स्तरावर प्रथमच उत्पादन मॉडेल लाँच केले. कंपनीने दोन वर्षांनंतर म्हणजेच 2023 मध्ये याला नवीन अपडेट दिले.
युरोपमध्ये लॉन्च झाल्यानंतर सुमारे एक वर्षानंतर EQA भारतात सादर करण्यात आला. EQA ची एक्स-शोरूम किंमत 66 लाख रुपये आहे. तर EQB 350 4M 5-सीट व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 77.5 लाख रुपये ठेवण्यात आली.
तर कंपनीच्या सात आसनी EQB 250+ 5 e ची एक्स-शोरूम किंमत 70.90 रुपये ठेवण्यात आली आहे. EQA 250+ 70.5 kWh बॅटरी बँकसह सुसज्ज आहे जी एका चार्जवर 560 किमी पर्यंतची श्रेणी प्रदान करू शकते EQB 350 4M मध्ये 66.5 kWh बॅटरी पॅक आहे जो कमाल 447 किमी श्रेणी प्रदान करू शकतो. कंपनीने 70.90 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीवर EQB 250 प्रकार लॉन्च केला आहे आणि EQB 250 ची श्रेणी 535 किमी पर्यंत आहे आणि त्यात 70.5 kWh बॅटरी पॅक आहे.
कंपनीची ही कार सात रंग पर्यायांसह येते, तसेच कंपनीचा दावा आहे की ही कार एका चार्जवर 560 किलोमीटरची रेंज देते. याशिवाय ही कार 1 रुपये प्रति किलोमीटर धावण्याचा दावा करते. कार 70.5kWh बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे.
कारचा टॉप स्पीड 160km/h आहे गेल्या वर्षी, कंपनीने जागतिक बाजारपेठेत EQA सादर केले होते आता मर्सिडीजने भारताच्या EV क्षेत्रात परवडणारे मॉडेल म्हणून प्रवेश केला आहे.