… जर सरकार बदलले नसते, तर आत्तापर्यंत ‘ते’ काम पूर्ण झाले असते : आमदार रोहित पवार

Updated on -

Ahmednagar News : ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्त्वाचा झेंडा देशभर फडकवला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामासाठी निधी द्या. अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली.

याबाबत आमदार पवार यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन दिले आहे. जर सरकार बदलले नसते, तर अद्यापपर्यंत या शाळेचे काम देखील सुरु झाले असते असे देखील आ.पवार म्हणाले.

यात नमूद केले आहे कि, ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’निमित्त महाविकास आघाडी सरकारच्या काळात महापुरुषांशी संबधित असलेल्या ऐतिहासिक गावांमधील शाळा विकसित करण्यासाठी निधी देण्याची घोषणा तात्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली होती.

मात्र यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या श्री क्षेत्र चौंडी गावातील जिल्हा परिषद शाळेचा सामावेश केला नव्हता. त्यामुळे आ. पवार यांनी अर्थमंत्री अजित पवार यांना पत्र देऊन चौंडी येथील शाळेचा समावेश करण्याची विनंती केली.

त्यानुसार चौंडी येथील शाळेचा या योजनेत समावेश करण्याची घोषणा अजित पवार यांनी अधिवेशनात केली होती. त्यानंतर येथील शाळेच्या बांधकामासाठीही मंजुरी मिळाली. मात्र राज्य सरकारकडून अद्याप जिल्हा परिषदेकडे निधी वर्ग करण्यात आलेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर या शाळेच्या बांधकामासाठी निधी द्या.

सध्या सर्वत्र शाळा सुरु झालेल्या आहेत त्यामुळे चिमुकल्यांच्या पुढील शिक्षणाचा विचार करून सरकारने तात्काळ या शाळेसाठी निधी मंजूर करावा.अशी मागणी करत जर सरकार बदलले नसते, तर अद्यापपर्यंत या शाळेचे काम देखील सुरु झाले असते असे देखील आ.पवार म्हणाले.

तसेच जिल्हास्तरावरून देखील या शाळेच्या बांधकामासाठी निधीचा मागणी प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला असल्याचे सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe