Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे वृत्त आले आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात हे धक्के जाणवले.
सकाळी ७.१५ वाजता हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी भागात ४.५ इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली. या भूकंपाचे हे सौम्य धक्के असल्याचे सांगितले जात आहे.

समजलेली अधिक माहिती अशी : आज बुधवारी (१० जुलै) सकाळी सव्वासात ते ७.१८ वाजताच्या दरम्यान संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात सौम्य धक्के जाणवले. एका जागेवर असणाऱ्यांना हे धक्के दोनदा जाणवल्याने नागरिकांनी संगितले.
पूर्व -पश्चिम धक्का बसल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. या भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे घरातील कपाटे, भांड्यांचा किणकिणाट झाल्याचेही नागरिक सांगतात. घारगाव परिसरात जे धक्के भूकंपाचे जाणवले त्याची तीव्रता अत्यंत कमी असल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे कदाचित या सौम्य धक्क्यांच्या नोंदी नाशिक येथील भूकंपमापक यंत्रावर झाल्या नसल्याचे मेरी संस्थेच्या भूवैज्ञानिक यांनी सांगितलेय. दरम्यान याआधी देखील बऱ्याच वेळा संगमनेर तालुक्यातील बोटा तसेच घारगाव या परिसरात सौम्य भुकंपाचे धक्के बसलेले होते.
त्यावेळी या धक्क्यांच्या नोंदी नाशिक येथील भूकंपमापक यंत्रावर झालेल्या होत्या.
नागरिकांत भीती, संभ्रम
नागरिकांमध्ये या भूकंपाच्या धक्क्यानंतर काही काळ भीतीचे वातावरण होते. नागरिकांत, सोशल मीडियावर हाच विषय रंगलेला होता. जेथे भांड्यांची किणकिणाट जाणवली तेथे मात्र थोडीशी भीती नागरिकांत होती.
दरम्यान जेथे या भूकंपाचे मूळ होते तेथे म्हणजे हिंगोली जिल्ह्यात तेथूनच काही अंतरावरील नांदेड आणि परभणी जिल्ह्यात देखील हे हादरे जाणवले असल्याचे समजते.
राष्ट्रीय भुकंपशास्त्र केंद्राकडूनही याबाबत सांगण्यात आले आहे. दरम्यान या भूकंपाचे धक्के सौम्य असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.