Ahmednagar News : नगर महानगरपालिकेच्या रिक्त झालेल्या आयुक्तपदी दोन दिवसांपूर्वी देविदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र पवार यांनी नगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
त्यामुळे आता नगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पिंपरी चिंचवडचे उपायुक्त यशवंत डांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिणामी आता पवार यांची नगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी झालेली बदली प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. तसे आदेश राज्य सरकारने काढले आहेत.

नगर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त पंकज जावळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यात शहरात असलेले विविध सॊडवण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची गरज असल्याने मागील दोन दिवसापूर्वी राज्य शासनाने अमरावतीचे आयुक्त देविदास पवार यांची नगर महानगरपालिकेच्या रिक्त झालेल्या आयुक्तपदी नियुक्ती केली होती.
आयुक्त देविदास पवार यांनी नगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे देखील हातात घेतली नव्हती मात्र आता राज्य सरकारने परत नव्याने बदलीची प्रक्रिया करत आता पिंपरी चिंचवडचे उपायुक्त यशवंत डांगे यांची अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.
दरम्यान डांगे यांनी यापूर्वी नगर महानगरपालिकेमध्ये दोन वर्ष उपायुक्त पदाचा पदभार सांभाळला होता. त्यामुळे त्यांना नगरमध्ये काम करण्याचा अनुभव असल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते . मात्र पवार यांची अवघ्यादोन दिवसातच का बदली करण्यात आली हे गुलदस्त्यातच आहे.