Ahmednagar News : आषाढी वारी व आषाढी एकादशी नंतर वारकरी भाविकांच्या दिंडया या परतीचा प्रवास अहमदनगर जिल्ह्यातून करणार असल्याकारणाने दि.२१/०७/२०२७ रोजीचे २४/०० वा. पावेतो कायम ठेवण्यात येत आहेत, तसेच इतर जिल्हयातुन मोठ्या प्रमाणात वारकरी भाविकांच्या दिंडया अहमदनगर शहरातुन जाणार आहेत. सदर दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी होणार आहेत.
सध्या अहमदनगर – मनमाड या महामार्गावरील पत्रकार चौक ते एसपीओ चौकादरम्यान रोडचचे कॉक्रीटीकरणाचे काम प्रगतीपथावर असुन सदर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असते. तसेच नगर मनमाड हायवेवरील शिंगणापुर फाटा ते राहुरी दरम्यान रोड दुरुस्तीचे काम सुरु असुन ते प्रगतीपथावर आहे.

सदर महामार्गावरुन अवजड वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरु असते. सदर अवजड वाहनांचा दिंडीतील भाविकांना धक्का लागुन अपघात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दि.१७/०७/२०२४ रोजी आषाढी एकादशी नंतर वारकरी भाविकांच्या दिंडया या परतीचा प्रवास करणार आहेत. त्यामुळे दिंडीमधील वारकऱ्यांचे सुरक्षेच्या कारणास्तव अहमदनगर मनमाड रोडवरील विळद बायपास ते पुनतांबा फाटा पर्यंत वाहतुकीच्या बदलाचे आदेश अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आहेत.
अहमदनगर- मनमाड वा महामार्गावरील विळद बायपास ते पुनतांबा फाटा पर्यंतची अवजड वाहतुक खालीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वळविणेबाबतच्या आदेशामध्ये अंशतः बदल करुन सदरचा आदेश दि.२१/०७/२०२७ रोजीचे २४/०० वा. पावेतो कायम ठेवण्यात येत आहे
अहमदनगरकडुन मनमाडकडे जाणारे जाणारे जड वाहनांकरीता पर्यायी मार्ग :
विळद बायपास – शेंडी बायपास नेवासा कायगाव गंगापुर वैजापुर येवलमार्गे मनमाड कडे किंवा केडगाव बायपास – कल्याण बायपास आळेफाटा संगमनेर मार्गे नाशिककडे.
शनि शिंगणापुर सोनई वरुन राहुरी मार्गे मनमाडकडे जाणारे जड वाहने अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरुन इच्छित स्थळी जातील.
देहरे – राहुरी कृषी विदयापिठ, राहुरी कडुन मनमाडकडे जाणारे जड वाहनांकरीता पर्यायी मार्ग : श्रीरामपुर – बाभळेश्वर – निर्मळ पिंपरी बायपास मार्ग कोपरगाव – येवला – मनमाडकडे.
मनमाड कडुन अहमदनगरकडे येणारे जड वाहनांकरीता पर्यायी मार्ग : पुणतांबा फाटा – वैजापुर – गंगापुर कायगाव नेवासा – शेंडी बायपास विळद बायपास – केडगाव बायपास – लोणी / बाभळेश्वरकडून अहमदनगकडे येणारे जड वाहनांकरीता पर्यायी मार्ग : बाभळेश्वर – श्रीरामपुर – टाकळीभान नेवासा मार्गे अहमदनगर कडे.
मनमाड कडुन अहमदनगर मार्गे पुणे / मुंबई / कल्याणकडे जाणारे जड वाहनांकरीता पर्यायी मार्ग पुणतांबा फाटा – झंगडे फाटा सिन्नर नांदुर शिंगोटे संगमनेर – आळेफाटा मार्गे .