भूकंपाचे धक्के बसल्याने महाराष्ट्रात खरच कमी पाऊस पडणार का ? भूकंपाचा आणि पावसाचा काय संबंध असतो ? पंजाबरावांनी दिली मोठी माहिती

Tejas B Shelar
Published:
Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : आज सकाळी महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात भूकंपाचे धक्के बसलेत. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील जनतेमध्ये मोठे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सकाळी आलेल्या या भूकंपामुळे अजूनही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सकाळी अचानक आलेल्या भूकंपामुळे मराठवाड्यातील चार जिल्ह्यांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण होते.

विदर्भातील वाशिम जिल्ह्यातही भूकंपाचे झटके बसलेत आणि यामुळे तेथेही थोडेसे पॅनिक वातावरण होते. मराठवाड्याबाबत बोलायचं झालं तर येथील नांदेड, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना भूकंपाचे झटके बसलेत.

परिणामी या संबंधित जिल्ह्यातील नागरिकांमध्ये मोठे भीतीचे आणि चिंतेचे वातावरण तयार झाले. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाड्यासहित विदर्भाकडे पाठ फिरवलेला पाऊस पुन्हा एकदा मराठवाडा आणि विदर्भात सक्रिय झाला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. विदर्भातही चांगल्या जोरदार पावसाची हजेरी लागली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे.

अशातच आज मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांना भूकंपाचे धक्के बसले आहेत. सुदैवाने या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीचं जीवित हानी झालेली नाही. परंतु अनेकांच्या माध्यमातून या भूकंपामुळे मान्सून वर काही परिणाम होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान याच संदर्भात जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मोठी माहिती दिली आहे. भूकंपामुळे मान्सून काळात पावसावर काही विपरीत परिणाम होणार का ? असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल.

तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा भूकंप पावसासाठी सकारात्मक ठरणार असे पंजाब रावांनी सांगितले आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात बसलेले भूकंपाचे धक्के हे भविष्यात चांगला पाऊस होणार याचे संकेत असू शकतात असे भाकीत पंजाबरावांनी व्यक्त केले आहे.

पंजाबराव डख यांनी यावेळी भूकंप हे नेहमीचं चांगल्या पावसाचे लक्षण राहिले आहे. जेव्हा भूकंपाचे धक्के बसतात, तेव्हा खूप पाऊस पडतो, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

ते म्हणालेत की, लातूर जिल्ह्यातील किल्लारीला जेव्हा भूकंप झाला होता, त्या वर्षी राज्यात खूप पाऊस झाला होता. तशीच परिस्थिती यावेळी देखील राहणार असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

निश्चितच, पंजाबरावांचे हे भाकीत किती टक्के खरे ठरते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. यंदाच्या मान्सून काळात पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे चांगला पाऊस होतो का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe